AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही माझ्यासारख्याला…. नाराजीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना आपण कुठेही नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू नये यावर भर दिला.

तुम्ही माझ्यासारख्याला.... नाराजीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले
Sudhir Mungantiwar
| Updated on: Apr 01, 2025 | 5:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच आता चंद्रपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुक पोस्ट केली. त्यावेळी त्यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे नाव घेणं टाळलं. त्यातच चंद्रपुरात केलेल्या भाषणावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीचे तख्त राखायचे असतील तर चंद्रपूरला सोबत घेऊन जावं लागेल, असे विधान केले. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाला. आता या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाराजीच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले. “मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा उणे करु नका

“हे अर्धवट डोक्यातून निघालेलं इंटरप्रिटेशन आहे. भाषण काय होतं की विकासादरम्यान कुठेही या जिल्ह्याला पैसे कमी पडू नये. विकासाला पैसे देताना मी सांस्कृतिक मंत्री म्हणून नाट्यगृहाची मागणी या गावाने केली आहे. त्यासाठी पैसे कमी पडू देऊ नका. कारण मी राज्यगीत केलेलं आहे. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा…पण महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखत असताना चंद्रपूर जिल्हा उणे करु नका. चंद्रपूर जिल्ह्याला मायनस करु नका”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकलेले नाही

कशाचीही नाराजी नाही. कशासाठी नाराजी आहे. फक्त हेच जीवन आहे. आतातरी तुम्ही समजून घ्या की माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकलेले नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सुधीर मुनगंटीवार भाषणावेळी काय म्हणाले?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण केले होते. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशा शब्दात सुधीर मुनंगटीवार यांनी भावना व्यक्त केली. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला गेला होता. त्यात राज्याचे आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली, असे बोललं जात आहेत.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल