आदर्श भारतीय स्त्री कशी दिसते तर सुलोचना दीदींसारखी; राज ठाकरेंकडून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

एक आदर्श भारतीय स्त्री (Ideal Indian woman) कशी दिसते; तर सुलोचना दीदींसारखी, हे चित्र आपल्या भारतीय समाजमनात फिट्ट आहे. सुलोचना दीदींना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुलोचना दीदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात सुलोचना दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदर्श भारतीय स्त्री कशी दिसते तर सुलोचना दीदींसारखी; राज ठाकरेंकडून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
राज ठाकरे यांच्याकडून सुलोचना दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Image Credit source: Google
| Updated on: Jul 30, 2022 | 7:42 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कलाप्रेम सर्वश्रृत आहे. राजकारणात व्यग्र असले तरी कलाश्रेत्रातील अनेक मान्यवरांसोबत त्यांची उठबस असते. तसंच राज ठाकरे यांच्या आवडी निवडीसह त्यांचा कलेशी संबंधित अभ्यासही दांडगा आहे. त्यामुळे अनेक कलाकार (Artist) राज ठाकरे यांना मानतात. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या मतांना कलाश्रेत्रातही खूप महत्व आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochna Latkar) अर्थात सुलोचना दिदी यांचा आज 94 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी सुलोचना दिदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

तब्बल सात दशकांहून अधिक काळ आपल्या सहज अभिनयाने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा आज 94 वा वाढदिवस आहे. शेकडो सिनेमांमध्ये दिदींनी सोज्वळ, शांत आणि घरंदाज पत्नीची, आईची भूमिका केल्यामुळे एक आदर्श भारतीय स्त्री कशी दिसते; तर सुलोचना दीदींसारखी, हे चित्र आपल्या भारतीय समाजमनात फिट्ट आहे. सुलोचना दीदींना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुलोचना दीदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात सुलोचना दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही तीव्र प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांनी ट्वीट करुन कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. ‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात’.

‘महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यपालांना इशारा दिलाय.