AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात ‘सुनेत्रा पर्व’ सुरू, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे.

मोठी बातमी! राज्यात 'सुनेत्रा पर्व' सुरू, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2026 | 7:26 PM
Share

Sunetra Pawar NCP Chief : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. अजितदादांकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. त्यानंतर अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा चालू होती. परंतु अजितदादांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यात स्वारस्य न दाखवल्याने आता ही चर्चा मागे पडली आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर आता राज्यात नवे सुनेत्रा पर्व सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या अधिवेशनात नावाची घोषणा

मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे इतरही काही नेते आणि पदाधिकार उपस्थित होते. यावेळी अधिवेसनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वच नेत्यांनी एकमताने सहमती दाखवली. आता राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्ययक्ष प्रफुल्ल पटेल हेच असतील. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे असेल. सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

सुनेत्रा पवार बारामतीच्या आमदार होणार?

दरम्यान, अजितदादांकडे असलेल्या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्या आहेत. यासह सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही लढवणार आहेत. तसे झाले तर ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात सुनेत्रा पवार या बारामतीच्या आमदार ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. ते राज्यसभेत खासदार होणार आहेत. तशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...