Maharashtra Assembly Session 2026 LIVE : सुनेत्रा पवार यांची एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड – सुनीट तटकरे
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज चौथा दिवस आहे. अनेक मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज काय काय होणार, त्याचे अपडेट्स जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
सुनेत्रा पवार यांची एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड – सुनीट तटकरे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अजितदादा यांच्या अपघातीनिधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. पक्षाच्या वरळी डोम येथील अधिवेशनात तटकरे यांनी ही घोषणा केली.
-
ठाणे पालिका भरतीत उमेदवारांना न्याय द्या – मनसेचे नेते अविनाश जाधव
ठाणे महानगरपालिकेच्या ४०० पदांसाठी. गेल्यावर्षी भरतीची प्रक्रिया राबविली होती.या भरती प्रक्रियेत १४ हजार विद्यार्थी आणि स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी १८००/-रुपये अर्जासोबत भरले होते. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या प्रक्रियेला स्थगिती आलेली आहे. आज या संदर्भात आयुक्तांची भेट घेतलेली आहे.उमेदवारांना ऐजबार करु नये अशी मागणी आयुक्तांनी भेटून केल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
-
-
रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो – गुणरत्न सदावर्ते
आमदार रोहित पवार हे केवळ चमकोगिरी करीत आहेत अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. अजित पवार यांचा अपघाती तपास पोलीस योग्य दिशेने करीत आहेत. कालच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. रोहित पवारला विमान अपघातात काय समजते असाही सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
-
बोरगाव-नवेखेडमध्ये कृष्णा नदीच्या पात्रात हजारो माशांचा मृत्यू
सांगलीच्या कृष्णा नदीत गेल्या तीन दिवसांपासून माशांचा मृत्यू होत आहे. वाळवा तालुक्यातल्या बोरगाव नवेखेड या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, बोरगाव इथल्या बंधार्यावर आणि नदीच्या काठावर मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरली आहे. नदीच्या काठी असणाऱ्या कारखान्यांकडून नदीपात्रामध्ये दुषीत पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
मुंबईत 2 मार्चला वंचितचे धरणे आंदोलन
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २ मार्च रोजी मुंबईत भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई कमिटीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांनी सहभागी होऊन समर्थन द्यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
-
-
लिपिकांचे कामबंद आंदोलन, जळगाव जिल्हा परिषदेचं कामकाज ठप्प
जळगाव जिल्हा परिषदेच्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचं कामकाज ठप्प झाल आहे. ऐन अधिवेशन काळात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना जिल्हा परिषदेच्या तसेच सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना करावा लागत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात 6,200 हेक्टर क्षेत्रावर धान नर्सरी
गोंदिया जिल्ह्यात 6,200 हेक्टरवर धान नर्सरी
65 हजार हेक्टर लागवडीचे लक्ष्य
रब्बी हंगामात धान रोवणीला वेग
23 हजार हेक्टरवर लागवड पूर्ण
शेतकरी मका-भाजीपाल्याकडे वळल्याने यंदा धान क्षेत्रात घट होण्याची शक्यता
-
-
जरांगे पाटील यांना शंका असल्यास…-उदय सामंत
विखे पाटलांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची आहे. जरांगे पाटील यांना शंका असेल तर त्यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. आम्ही ठाकरेंबाबत विधान केलंच नाहीये त्यांनी राज्यसभा शरद पवारांना द्यावी किंवा इतर कुणाला द्यावी हा त्यांचा अधिकार पण त्यांनीही रोज सकाळी आमच्यावर टीका करणं बंद करावी. सचिन अहिर माझे मित्र ते मातोश्रीच्या सगळ्यात जवळचे, पुर्वी मिलिंद नार्वेकर हे जवळचे होते आत्ता त्यांची जागा सचिन अहिर यांनी घेतलीये असे ते म्हणाले.
-
विरोधकांची कॅसेट तिथंच अडकलीये-देवेंद्र फडणवीस
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. राज्यातील विरोधकांची कॅसेट तिथं अडकली आहे. त्यांचे तेच तेच मुद्दे आहेत असा टोला फडणवीस यांनी लावला. तर विरोधक हे संभ्रमीत आणि भ्रमित असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
-
एकनाथ शिंदे यांचे खासदारही याबाबत आवाज उठवतील-आमदार रोहित पवार
मी किंवा त्यांच्या पक्षातील नेते आपल्या स्तरावर लढत आहेत. दादांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एखादा व्यक्ती योग्य लढत असेल पवार साहेबांचा त्याला पाठिंबा असतो. याबाबत लोकसभेत सुप्रिया सुळे 9 तारखेला विषय मांडणार आहेत.एकनाथ शिंदे यांचे खासदारही याबाबत आवाज उठवतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
-
शरद पवार यांचा पाठिंबा-रोहित पवार
एखादी व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेब त्याला पाठिंबा देतात. त्यासाठी साहेबांनी बोललं पाहिजे असं नाही. दिल्लीत आम्ही शरद पवारांच्या बंगल्यातच पीसी घेतली. येत्या ९ तारखेला संसदेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, ठाकरे गटाचे खासदार आणि शिंदे गटाचे खासदार मुद्दा मांडणार आहे. शिंदे गटाचा विरोध नाही. ते आमच्यासाठी मुद्दा मांडणार आहे. विरोध फक्त भाजपचाच आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
-
पुण्यात सीआयडी कार्यालयात जाणार- रोहित पवार
एक दीड तास युगेंद्र इथे असतील. मुंबईत दोन तास दिले होते. पण १५ तास झाले तरी त्यांनी काही केलं नाही. सीआयडी काय करतं हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी ३ वाजता पुण्यात जाऊन दाद मागू. सीआयडीची पत्रकार परिषद ऐकू. आणि ३ वाजता आम्ही जाणार आहोत, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
-
कुणाचा तरी दबाव आहे-रोहित पवार
मी एवढेच म्हणेल कुणाचा तरी दबाव आहे. जेव्हा अंत्यविधी झाला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आताही आम्ही सांगताना ते भावूक झाले. पण त्यांचा पेन एफआयआरवर वळत नाही. याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. सत्तेतील लोकांना ते नको असेल असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
-
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नाही-रोहित पवार
एफआयर व्हावा हे माझं, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे. सर्वांचं स्टेटमेंट आहे. आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं असतं तर केलं असतं. या पत्रावर सह्या आहेत. याचं कारण आमच्या काकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा एफआयआर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सह्या केल्या आहे. आम्ही चार चार पुस्तके वाचली. वकिलांनी सांगितलं तरी एफआयआर दाखल करून घेतला जात नाही असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले.
-
दादा एवढे मोठे नेते, मग तरीही गुन्हा दाखल होत नाही ? रोहित पवार यांचे सवाल
आम्ही दोन तास पोलिसांसमोर बसून त्यांना पुस्तकं वाचून दाखवली मात्र गुन्हा दाखल झाला नाही. अजित दादा, एवढे मोठे नेते आहेत मग तरीही गुन्हा दाखल होत नाही ? काल पुण्यातील कबुतरं चोरीला गेली तर गुन्हा दाखल झाला, मात्र अजितदादांच्या अपघातात गुन्हा दाखल का करत नाही ? रोहित पवार यांचे सवाल
-
आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा वगैरे मागितला नाही – रोहित पवार
आम्हाला या मुद्याचं राजकारण करायचं नाही. आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा वगैरे मागितला नाही. काही चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत – रोहित पवार यांचं स्पष्टीकरण.
-
अजित दादांना न्याय का मिळत नाही ? रोहित पवार यांचा सवाल
झारखंडमध्ये परवा प्लेन क्रॅश झालं, त्यानंतर रेड बर्ड कंपनीवर गुन्हा दाखल झाला. मात्र आमचा एवढा मोठा नेता गेला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल का होत नाही? अजितदादा हे मोठे नेते नाहीत असं प्रशासनाला वाटतंय का? दादांना न्याय का मिळत नाही ? – संतप्त रोहित पवार यांचा प्रश्नांचा भडिमार
-
त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – रोहित पवार
Arrow नावाच्या कंपनीतील पवार नावाच्या अधिकाऱ्याने हवामान चांगले असल्याचे सांगितले. त्यामुळे ज्या ग्रुप मध्ये चर्चा झाला त्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. VSR कंपनी आणि उड्डाणमंत्री असलेल्या नेत्याच्या पार्टीचे कंपनीशी आर्थिक संबंध आहेत – रोहित पवारांचे आरोप
-
लेअरजेट 45 XR हे विमान बंद ठेवले, मग ते विमान अजितदादांना का दिलं ?
VSR कंपनीच्या 5 विमानांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली. लेअरजेट 45 XR हे विमान बंद ठेवलं. मग अजितदादांना ते विमान का दिलं गेलं? हे विमान दादांना मुद्दाम दिले की चुकून दिले? – रोहित पवार यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
-
मुंबईत FIR करता येता का याचा प्रयत्न केला – रोहित पवार
डीजीसीएच्या रिपोर्टनंतर मुंबईत FIR करता येता का याचा प्रयत्न केला. पण काल ते झालं नाही, म्हणून आज बारामतीत आलोय – रोहित पवार
-
मालेगाव – मनपा कार्यालयात नमाज पठण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
मालेगाव – मनपा कार्यालयात नमाज पठण प्रकरणी अखेर मालेगाव किल्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसंघर्ष समितीचे लुकमान, सलीम एक्का यांच्यासह ४ ते ५ जणांवर कारवाई. मनपाच्या विद्युत विभाग कार्यालयात नमाज पठण केल्याचा आरोप होता.
-
वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका
वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. त्याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी आहे,
-
संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निकाल
मीरा-भाईंदर शौचालय घोटाळ्याबाबत संजय राऊतांवर आरोप होते. मेधा सोमय्या यांनी राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. माझगाव कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने संजय राऊतांची निर्दोष मुक्तता केली आहे.
-
सरकारी कार्यालये ही धार्मिक स्थळे बनवू नयेत, मशिदीतच नमाज पठण करावं- संजय गायकवाड
“मी हजारो पत्र केंद्र सरकारकडे पाठवली आहेत, मुलींची धर्मांतरे होत आहेत, लग्न होत असताना आई वडिलांची परवानगी आवश्यक आहे. हा कायदा आला पाहिजे. इतर धर्मियांशी लग्न करताना त्या धर्मातील आई वडिलांची परवानगी अनिवार्य असते. नमाज पठण करणाऱ्यांनी मशिदीतच नमाज पठण करावं , नाहीतर अॅक्शनला रिअॅक्शन येईलच. सरकारी कार्यालये ही धार्मिक स्थळे बनवू नयेत,” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
-
रोहित पवारांची तासाभरापासून बारामती पोलिसांसोबत बैठक
गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलिसांनी माहिती मागवली आहे. बारामती पोलिसांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मागवली आहे. रोहित पवारांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशची माहिती दिली. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.
-
रोहित पवार यांचे काका गेले, पण राज्याचे दादा गेले, त्यांनी संयमाने घ्यावं- संजय गायकवाड
“विमान क्रॅश झालं त्याचवेळी ब्लॅकबाॅक्स सुरक्षित होतं असं बोलण्यात आलं होतं. मग तो खराब झाला अशी बातमी आली. आता तो सुरक्षित आहे असं समजतंय. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही दिवस वाट पहायला पाहिजे. रोहित पवार यांचे काका गेले, पण राज्याचे दादा गेले. त्यांनी संयमाने घेणं गरजेचं आहे. सीबीआय चौकशीत सगळंच बाहेर येईल. संजय राऊत आगीत तेल ओतणारा माणूस आहे. ते राज्याचं हित पाहू शकणार नाहीत,” असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.
-
एकनाथ शिंदेंच्या सेनेचे नेते आणि मंत्री VSR चे विमान वापरणार नाहीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेचे नेते आणि मंत्री VSR चे विमान वापरणार नाहीत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा निर्णय एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आला आहे.
-
बीडच्या चौसाळा इथल्या परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात तब्बल 17 शिक्षक निलंबित
बीडच्या चौसाळा इथल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार समोर आला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉपीला मदत करणाऱ्या 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले होते. यानंतर आता या सर्व शिक्षकांवर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व शिक्षक वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यरत होते त्या शाळांच्या व्यवस्थापनाने निलंबनाचे आदेश काढले आहेत.
-
शरद पवार यांची तब्येत सुधारली, दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत सुधारली. ते सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शरद पवार उपचार घेत आहेत. शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. आता अजून दोन दिवस शरद पवार या रुग्णालयात असणार आहे. खासदार सुप्रिया सुळे हे शरद पवार यांच्या सोबत रुग्णालयात आहेत. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे
-
कांदिवलीतील बालभारती कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याने नवा वाद
कांदिवलीतील बाल भारती कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिलेले आहे, जे आता वादाचा विषय बनले आहे. सर्व महाविद्यालयांची नावे ठळक मराठी अक्षरात दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे आदेश असताना कांदिवलीच्या महाविद्यालयाने या आदेशाला हरताळ फासला आहे. या महाविद्यालयावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाल भारती महाविद्यालयाची नामफलक मराठीत बदलण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर एक मराठी नामफलक स्टिकर चिकटवण्यात आला जो निघून गेला आहे.
-
जळगावात आयटीआयजवळील घंटागाडी डेपो संदर्भात विद्यार्थ्यांची तक्रार, महापौर, उपमहापौर प्रत्यक्ष पाहणी करणार
जळगावात आयटीआयजवळील घंटागाडी डेपो संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर महापौर, उपमहापौर प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा घंटागाडी डेपो येथून लवकरात लवकर हलवला जाईल, असे आश्वासन महापौर आणि उपमहापौर यांनी यावेळी दिले
-
उजनीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे प्रमाण वाढले, भाजप आमदाराने विधानसभेत मांडला प्रश्न
उजनीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे प्रमाण वाढले. भाजप आमदार देवेंद्र कोठेनीं यांनी विधानसभेत लक्ष वेधले. सोलापूरसाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषित होणाऱ्या पाण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून पुणे, पिंपरी तसेच कुरकुंभ एमआयडीसी भागातील कारखान्यांचे दूषित पाणी उजनी धरणात मिसळले जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देवेंद्र कोठेनी यांनी केला आहे. सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी पाच ते सहा मोठे रुग्णालय सुरू असून यावर गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती देवेंद्र कोठेनी यांनी केली आहे.
-
रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, तक्रार दाखल करुन सविस्तर बोलणार
रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, रोहित पवार DGCA, VSR विरोधात तक्रार दाखल करणार आहे. रोहित पवारांसोबत युगेंद्र पवारदेखील त्यांच्यासोबत बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर सविस्तर बोलणार, अशी माहिती रोहित पवारांनी यावेळी दिली.
-
भाजपमधून कुणाचा अपघात झाला असता तर हलक्यात घेतलं असतं का? संजय राऊतांचा सवाल
तुमचे सगळे अश्रू मगरीचे होते. भाजपमधून कुणाचा अपघात झाला असता तर हलक्यात घेतलं असतं का? कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
-
अजित दादांचा विमान अपघाताप्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय : संजय राऊत
अजित दादांचा विमान अपघात सरकार हलक्यात घेतंय. VSR कंपनीत अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत. अपघाताबाबात रोहित पवारांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
-
नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनापूर्वी वादाची ठिणगी, साहित्य वर्तुळात खळबळ
नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलना आधीच वादाची ठिणगी पडली आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थांनी पत्र काढत रोष व्यक्त केला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी संतपरंपरेचा अवमान केला, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. आयोजकांना संत परंपरेचा आणि संतांच्या योगदानाचा विसर पडला आहे. मराठी भाषेला पहिला मान संतांनी दिला, मग साहित्य संमेलनात संतांचा सन्मान का नाही? असा सवालही या पत्रातून विचारण्यात आला आहे. या संमेलनाच्या नियोजन समितीकडे लेखी निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी ऐन संमेलनाच्या तोंडावर नवा वाद पेटल्याने साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
KDMC महासभा रखडल्याने ठाकरे गट आक्रमक
KDMC मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत महापौर-उपमहापौर याची निवड बिनविरोध तरही महासभा घेण्यास विलंब का ? …कुणाचा दबाव?… ठाकरे गटाचा सवाल. बजेट विहित वेळेत मंजूर न झाल्यास विकासकामांवर परिणाम होणार. 28 तारखेपर्यंत खुलासा करा, अन्यथा KDMC मुख्यालयावर ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करणार…शिवसेना उबाठा गटनेते उमेश बोरगावकर यांचा इशारा
-
फाटेला फरार घोषित करणार, संपत्ती जप्तीबाबतही कार्यवाही होणार
बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हा अद्यापही फरार आहे. त्याला अटक करावी या मागणीसाठी जाधवर कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले होते. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रदीप फाटे याला सोमवार पर्यंत अटक केली जाईल तसेच त्याला फरार घोषित करण्यात येईल
-
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बेलालीस पुलावर बस स्थानक नसल्याने नागरिक आक्रमक
उद्या होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर यांच्या उपस्थितीत उद्घाटन. १३० वर्ष जुन्या ब्रिटिश कालीन पुलावर बस स्थानक आणि खाली जाण्यास पायऱ्या होत्या. नवीन पुलावर बस स्थानक आणि बाहेर जाण्यास एक्सेस नसल्याने तो अक्सेस देण्यात यावा अशी स्थानिक आणि जेष्ठ नागरिकांची मागणी
-
गडचिरोली जिल्ह्यातील या तीन ठिकाणी 20 सेकंदाचे सौम्य भूकंप झटके
अकरा वाजून पन्नास मिनिटांनी भूकंप झटके आले. अहेरी नागेपली आलापल्ली या तीन ठिकाणी जाणवले भूकंप चे झटके 20 ते 25 सेकंद या भूकंपच्या झटक्यांमुळे नागरिकांमध्ये भीती. एक वर्ष अगोदरही या भागात भूकंप चे झटके जाणवले होते. काही सेकंदाचे भूकंपचे झटके अनेक ठिकाणी जाणवले
-
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 4 दिवस
विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरती चर्चेला सुरुवात होईल..अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून 11000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत..त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली जात असल्याचा आरोप करत विरोधक सरकारवरती जोरदार टीका करतील..पुरवणी मागण्यांच्या चर्चेनंतर विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार आहे..त्यामुळे विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकार वरती टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात..
-
रोशन गेट परिसरात अचानक लागली आग
छत्रपती संभाजीनगर शहरातील रोशन गेट परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सीमा दूध डेअरीसमोरील पॅराडाईज पिझ्झा या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसताच स्थानिक नागरिक आणि शेजारील दुकानदारांनी तत्काळ धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच आगीचा फैलाव रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
-
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड होणार असून त्यावेळी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे.
-
नाशकात विश्व मराठी साहित्य संमेलनाआधीच वादाची ठिणगी
विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थांचा पत्र काढत रोष.संमेलनाच्या आयोजकांनी संत परंपरेचा अवमान केल्याचा पत्रात आरोप. आयोजकांना संत परंपरेचा आणि संतांच्या योगदानाचा विसर पडल्याचाही आरोप. मराठी भाषेला पहिला मान संतांनी दिला, मग साहित्य संमेलनात संतांचा सन्मान का नाही? संमेलनाच्या नियोजन समितीकडे लेखी निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर नसल्याचाही करण्यात आला दावा.
-
कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर आळे येथे भीषण अपघात
पिकअप मालवाहू गाडी आणि जीपची जोरदार धडक होऊन 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पिकअप गाडीत कलिंगड भरलेले होते.
-
सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी 27 फेब्रुवारीला होणार बंद
कागदपत्रांअभावी शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता. गेल्या आठ-दहा दिवसांत कापसाच्या दरात 1000 ते 1200 रुपयांची घसरण. दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. दर न वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. खुल्या बाजारात कमी भावात विक्री करण्याची वेळ. नोंदणी बंद झाल्यास कापूस विकायचा कुठे? शेतकऱ्यांचा सवाल.
-
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस जोरदार गाजणार
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हा दिवस विरोधक जोरदार गाजवणार असल्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना दावोस दौऱ्यावरुन घेरतील. जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 दावोस आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत 15 लाख कोटी आणि 37 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून देखील सुमारे 70 लाख युवक बेरोजगार असल्याचे नोंद
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हा दिवस विरोधक जोरदार गाजवणार असल्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना दावोस दौऱ्यावरुन घेरतील. जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 दावोस आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत 15 लाख कोटी आणि 37 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून देखील सुमारे 70 लाख युवक बेरोजगार असल्याचे नोंद. त्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची माहिती. सोबतच बारावीच्या एका विद्यार्थ्यांचा प्रवासादरम्यान लोकल रेल्वेतून पडून अपघातात मृत्यू झाला. मुंबई लोकल रेल्वे बाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरती चर्चेला सुरुवात होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून 11000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली जात असल्याचा आरोप करत विरोधक सरकारवरती जोरदार टीका करतील.
Published On - Feb 26,2026 8:11 AM
