AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या मलाही कंगना रनौत यांनी…

खासदार सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावर आता सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या मलाही कंगना रनौत यांनी...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2025 | 5:45 PM
Share

खासदार सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, या कार्यक्रमाचा एक फोटो देखील समोर आला होता, त्यावरून विरोधकांनी सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती. दरम्यान आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणी कुठे जायचं हा  सर्वांना अधिकार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

कुणी कुठे जायचं हा  सर्वांना अधिकार आहे. मला देखील कंगना राणावत यांनी बोलावलं होतं मी नाही म्हणून सांगितलं, सुनेत्रा पवार त्या कार्यक्रमाला गेल्या तर हा प्रश्न त्यांना विचारा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं असं एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं, यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली, याला देखील त्यांनी उत्तर दिलं आहे.  ही लोकशाही आहे, विरोधकांना विरोध टीका करण्याचा अधिकार आहे. माझ्या पांडुरंगाला मटण खालेलं चालतं, हे वक्तव्य दाखवले, परंतु माझं भाषण 36 मिनिटं चाललं, त्यामध्ये मी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली, ते कोणी दाखवलं नाही, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विरोधकांकडून मतदान चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत, राज ठाकरे यांनी देखील यावर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन नेते देखील म्हणाले आहेत की मतचोरी होत आहे. आणि आता भारतीय जनता पार्टी देखील आमच्या अभियानात सामील होत आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आंदोलन हा सर्वांचा अधिकार असल्याची प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा