अजितदादा असते तर या तारखेला झालं असतं NCP विलीनीकरण; सुनील तटकरे यांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकर झालं असतं.

अजितदादा असते तर या तारखेला झालं असतं NCP विलीनीकरण; सुनील तटकरे यांचा मोठा गौप्यस्फोट
sunil tatkare
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 2:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रफुल पटेल यांनी काल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून चर्चांना उधाण आलं आहे. विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनील तटकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालं असतं, असा गौप्यस्फोट तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.ट

सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य करत चर्चांची राळ उडवून दिली आहे. सुनील तटकरे यांनी म्हटलं की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची सध्या तरी कुठलीच चर्चा नाही. पण अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते. अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली, अजित पवार असते तर जी 12 फेब्रुवारी तारीख सांगितली जाते, ती निश्चित झाली असती’. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणबाबत मोठं वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातही चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us