AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा कुणाला चेकमेट केलं होतं? भुजबळ हे खेळाडू आणि कलाकार… सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांसमोरच घेतला भुजबळांचा समाचार

Sunil Tatkare : भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ यांना टोला लगावला आहे.

तेव्हा कुणाला चेकमेट केलं होतं? भुजबळ हे खेळाडू आणि कलाकार... सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांसमोरच घेतला भुजबळांचा समाचार
Sunil tatkare on BhujbalImage Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 4:29 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. खासकरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही असं विधान केलं होतं. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच भुजबळांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दादांचे विचार हीच ऊर्जा…

राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना तटकरे यांनी म्हटले की, पक्षाचा 1999 ते 2026 हा कार्यकाळ झाला आहे, पण आपलं लाडकं नेतृत्व नाहीये. राज्यातील प्रत्येक नागरिकाला दादांची आठवण येते. दादांचे विचार हीच आमची ऊर्जा आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली होती. आता भाजप हा राज्यातील एक नंबरचा पक्ष आहे पण 2004 साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहिला होता. अजित पवार यांनी खूप काम केलं म्हणून आपला पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता.

… तर 2004 साली आपला मुख्यमंत्री झाला असता

तटकरे यांनी म्हटले की, ‘2004 साली काँग्रेस कडून जागा सोडवून घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि अजित दादांनी त्यावेळेस काँग्रेससोबत कटुता घेतली होती. 2004 साली विदर्भातून आपण सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या. ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या, त्यांचा मुख्यमंत्री असं जर 2004 ला ठरलं असत तर आपला मुख्यमंत्री बसला असतं. 2014 साली राज्यात ध्रुवीकरण झालं. 2019 चा शपथविधी म्हणजे हा पहाटेचा शपथविधी नव्हता. पण तेव्हा सोबत असतो तर काही काळानंतर पुढे गेलो असतो.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, दादांनी 2 जुलै 2023 ला एनडीए मधे जाण्याचा निर्णय हा छातीवर दगड ठेवून घेतला होता. लोकसभेनंतर अजित पवार यांनी जी ठोस भूमिका घेतली होती त्यामुळे विधानसभेत यश आले. अजित पवार चमत्कारिक नेते होते. अजित दादांनी विधानसभेच्या निवडणुकीत 72 टक्केचा स्टाईक रेट ठेवला होता. टीका टिप्पणी काही थांबली नाही आणि पुढेही ती होणार आहे.

छगन भुजबळ हे कलाकार – तटकरे

सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलताना म्हटले की, ‘छगन भुजबळ हे कबड्डीचे खेळाडू आहेत आणि ते सीने कलाकार आणि निर्माते आहेत. छगन भुजबळ यांनी कबड्डीमध्ये एक-एक खेळाडू बाद केले आहेत आणि एका वेळेस सर्व खेळाडूंना ते बाद करतात. शिवसेनेत छगन भुजबळ असताना त्यांनी दोन वेळा महापौर पद मिळवलं मग तेव्हा त्यांनी कोणाला चेकमेट केलं? आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजित दादांनी तयार केलं आहे’ असं विधान सुनेत्रा पवार यांच्यासमोर केलं आहे.

Follow Us
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन