AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाची जाहीर नाराजी, काय-काय घडलं?

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरुन आज पहिली सुनावणी पार पडली. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टात यावेळी चांगलाच युक्तिवाद झाला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.

Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाची जाहीर नाराजी, काय-काय घडलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 18, 2023 | 4:24 PM
Share

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरुन आज पहिली सुनावणी पार पडली. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने 11 मे ला राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला होता. त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, असं कोर्टाने म्हटलं होतं. पण विधानसभा अध्यक्षांकडून बरेच दिवस कारवाई न झाल्याने ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या प्रकरणाच्या याचिकेवर तीन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. तर अपात्रतेच्या प्रकरणावर दोन आठवड्याने सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घ्या, असा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्याचा कालावधी दिलाय. दोन आठवड्यात तुम्ही काय कारवाई केली ते सांगा, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

“विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचा निर्णय घ्यायला हवा. विधानसभेचा अध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे. विधानसभा अध्यक्ष हे एखाद्या न्यायाधीकरणाप्रमाणे काम करत असले तरी संविधानिक दृष्ट्या आपण त्यांचा उपहास करू शकत नाही”, असं सरन्यायाधीश म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या 11 मे च्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय-काय कारवाई केली, याबाबत विचारणा केली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “याबाबत तिथले सगळे मुद्दे आम्ही सांगू शकतो”, असं उत्तर दिलं. यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने नेमकं काय निरीक्षण नोंदवलं?

“11 मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असं सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं होतं. पण 11 मे नंतर काहीही झालं नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही”, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

“विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एका आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयावर आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे”, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?