INDIA Alliance Protest Live Updates : प्रियंका गांधी यांनी बसमध्ये पोलिसांनी नेताना दाखवली संविधानाची प्रत…
INDIA Alliance Protest Live Updates : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरला आगेकूच केले आहे. मात्र, काँग्रेसच्या नेत्या आणि खासदारांच्या जाणाऱ्या बसेस पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बसमधून उतरुन पायी चालत जाण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून गोंधळाची स्थिती तयार झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पश्चिम रेल्वेच्या खेळाडूंना 6 पदके
आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पश्चिम रेल्वेच्या खेळाडूंनी 6 पदके पटकवली
आशियाई खेळात 4 गोल्ड 2 सिल्व्हर
2 कब्बडीमध्ये, 2 हॉकी तर एक शुटिंग आणि एक कुस्तीमध्ये पदक
-
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात धामणा धरणात केवळ 2 टक्केच जिवंत पाणीसाठा
जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून मध्यम प्रकल्प आणि छोटे-मोठे तलाव यामधील पाणीसाठा आटत चाललाय, प्रशासनाकडून काही जलसाठ्यातील पाणी हे पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात केवळ दोन टक्केच पाणी साठा शिल्लक राहिल्याने पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाकडून अवैध पाणी उपसा होऊ नये याकरिता रात्रंदिवस पहारा देण्यात येत आहे.
-
-
इचलकरंजीत आमदार राहुल आवाडेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना इचलकरंजीचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी ₹४३०.२० कोटींच्या ‘राधाकृष्ण’ पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार झाल्याची घोषणा केल्याचा आरोप करत शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंग राजश्री मारूती पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
-
बीडमध्ये दुष्काळी उपाययोजनांसाठी भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीडमध्ये दुष्काळी उपाययोजनांसाठी भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीड शहर आणि ग्रामीण भागात टँकर सुरू करण्याची मागणी
कॅनॉल रोड ते पालीधरण नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी
शेतकऱ्यांना दुष्काळी मदत आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करण्याची मागणी
जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजपा नेते योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
-
प्रियंका गांधी यांनी बसमध्ये पोलिसांनी नेताना दाखवली संविधानाची प्रत…
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे. काल पोलिसांनी अटक केल्यानंतर सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवली होती. आज प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी अटक करुन बसमधून नेताना संविधानाची प्रत दाखविली आहे.
-
-
राहुल गांधींना ताब्यात घेतलेल्या गाडीवर कार्यकर्ते बसले..
काँग्रेसच्या नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्ते एकदम आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेल्या गाडीच्या छतावर चढून बसत घोषणाबाजी सुरु केली आहे.
-
प्रियंका गांधी यांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले
जंतरमंतरवर जाणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता रस्त्यावर झोपलेल्या प्रियंका गांधी यांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
-
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
जंतरमंतरवर जाणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
पोलिस खासदारांना मारत आहेत, ही लोकशाही आहे का ? प्रियंका यांचा सवाल
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन सुरु केले आहे. जंतरमंतरवर चाल करुन जाणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना रोखल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पोलिस खासदारांना मारत आहे ही लोकशाही आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.
-
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रस्त्यावर झोपल्या
पोलिसांकडून राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रस्त्यावर झोपल्या आहेत. जंतरमंतरवर चाल करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे.
-
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने बसच्या काचा डोक्याने फोडण्याचा केला प्रयत्न
काँग्रेसच्या कार्यकर्त्याने बसच्या काचा आपल्या डोक्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला राहुल गांधी यांनी हाताच्या इशाऱ्याने रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी बसमध्ये पोलिसांनी आत जाऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
-
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा पायी जंतरमंतरला जाण्याचा निर्णय
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जंतरमंतरला जाणाऱ्या बसेस अडवल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बसमधून उतरुन पायी चालत जाण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून गोंधळाची स्थिती तयार झाली आहे.
-
जंतरमंतरकडे जाणाऱ्या राहुल गांधी आणि खासदारांच्या बस रोखल्या
जंतरमंतरकडे जाणाऱ्या राहुल गांधी आणि खासदारांच्या बस रोखल्या रोखण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांचा प्रचंड ताफा घटनास्थळी सक्रीय झाला आहे.
-
जे काय मिळेल ते सोडू नका दुष्काळ आहे – युगेंद्र पवार यांचे वक्तव्य
जे काय मिळेल ते सोडू नका दुष्काळ आहे. फुकटचा पैसा आहे त्यांचा, दीपावली जवळ आली आहे. यंदा तीन पॅनल झाल्यामुळे बंपर सीजन आहे असे वक्तव्य सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक प्रचार सभेत शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी केले आहे.
-
तीन बस भरून खासदार जंतरमंतरकडे निघाले
राहुल गांधी यांच्यासोबत अनेक खासदार आहेत. एकूण तीन बसेसमध्ये खासदार बसलेले आहेत. राहुल गांधीदेखील बसमध्ये बसून जंतर मंतर मैदानाच्या दिशेने निघाले आहेत.
-
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, विरोधक जंतरमंतरकडे जाण्यावर ठाम
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीचे खासदार जंतरमंतरकडे निघाले आहेत. या खासदारांचे नेतृत्त्व राहुल गांधी करत आहेत. खासदारांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
-
राहुल गांधी जंतर-मंतरच्या दिशेने निघाले
राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते आता जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीला घेऊन इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू
2011 ची पक्षाची घटना ही योग्यच असल्याचे मोठे विधान नीरज काैल यांनी कोर्टात केले. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा अत्यंत मोठा दावा
कोणत्याही आमदाराने राजीनामा दिला नसल्याचे मोठे विधान एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज काैल यांनी केला.
-
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय- नीरज काैल
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्याचे मोठे विधान काैल यांनी केले.
-
राजकीय बदलांमुळे आमदारांना फरक पडला नाही- काैल
राजकीय बदलांमुळे आमदारांना फरक पडला नाही, असे मोठे विधान कोर्टात नीरज काैल यांनी केला.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सुरू
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुरू. प्रत्येक पक्षात अंतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत, असे मोठे विधान काैल यांनी कोर्टात केले.
-
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण – विरोधी पक्षातील नेते मुंबई डीजी सदानंद दाते यांची दुपारी 3 वाजता घेणार भेट
ठाणे – प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात विरोधी पक्षातील नेते मुंबई डीजी सदानंद दाते यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. माजी खासदार राजन विचारे,ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ncp sp पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान तसेच मुंबईतील आमदार निवेदन देणार आहेत.
-
काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही – एकनाथ शिंदे
आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. तेव्हा अनेक लोकांनी विघ्न घातली कोर्टात गेले मात्र कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – एकनाथ शिंदे
-
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी – एकनाथ शिंदे
हे बळीराजाचं सरकार आहे. मी शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द देण्यासाठी आलो – एकनाथ शिंदे
-
पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली – एकनाथ शिंदे
मध्यंतरी मी राजधानी दिल्लीत गेलो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा केली. अर्धा तास मोदी फक्त महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलले – एकनाथ शिंदे
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर 500 रुपयांनी तर चांदीचे दर 1000 रुपयांनी वाढले. या वाढीनंतर आता सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 440 रुपये झाले आहेत तर जीएसटीसह चांदीची किंमत 2 लाख 32 हजार 780 रुपये इतकी झाली आहे.
-
थकीत बिलांच्या प्रश्नांवर कंत्राटदारांचं उद्या राज्यभर आंदोलन
थकीत बिलांच्या प्रश्नांवर कंत्राटदारांचं उद्या राज्यभर आंदोलन आहे. कंत्राटदारांची 40 हजारांची बिलं थकीत असल्याचा दावा. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांकडे थकबाकी असल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे.
-
अजित दादा मोठ्या मनाचे, मी दादांसारखी नाही. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर – सुनेत्रा पवार
अजित दादा मोठ्या मनाचे, मी दादांसारखी नाही, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, असंही त्यांनी म्हटलं. नाव न घेता सुनेत्रा पवार यांनी पुरूषोत्तम जगताप हा इशारा दिला. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पुरूषोत्तम जगताप यांची बंजखोरी झाली होती.
-
नांदेड – एमपीएससी अंतर्गत महाज्योती गट ब आणि क च्या परीक्षा रद्द
नांदेड – एमपीएससी अंतर्गत महाज्योती गट ब आणि क च्या परीक्षा रद्द. मराठवाडा ऑनलाईन सेंटरवर महाज्योती आणि वनार्टीचा पेपर होता . मात्र ऑनलाईन पद्धतीने लॉगिन होत नसल्याने परीक्षा रद्द केली . पेपर रद्द झाल्याची माहिती दिली नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले.
-
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक, कोणाचे अर्ज ठरले वैध?
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक – अखेर अपक्ष उमेदवार संगीता शिंदें,शिवसेनेचे किरण सरनाईक, काँग्रेसच्या अदिती पोहरे, सुनावणीत यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला. तिघांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता, मात्र त्यांचा अर्ज आता वैध ठरला आहे.
-
दुष्काळाच्या छायेत विघ्नहरचा गळीत हंगाम सुरू; ऊसाच्या तुटवड्याचं मोठं आव्हान
दुष्काळी परिस्थिती आणि ऊसाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते कारखान्याचं मुळीपूजन करण्यात आलं.
-
सांगली- स्मृती मानधनाची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर मानधना कुटुंबात आनंदोत्सव
सांगलीची कन्या आणि स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.या निवडीनंतर मानधना कुटुंबात स्मृतीच्या कामगिरीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. कर्णधार निवडीनंतर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांनी स्मृतीच्या कर्णधारपदी निवड झाल्याचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे.
-
तळोजा जेलमध्ये कैद्याकडे सापडला गांजा
तळोजा इथल्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने अमली पदार्थ लपवून आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपीची ओळख सहेजद मोहम्मद सुधु शाह उर्फ सज्जु (२६) अशी असून तो मूळचा बदरपूर, दक्षिण दिल्ली येथील रहिवासी आहे. सध्या तो नेरळ, रायगड येथे राहत होता.
-
बीड- खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्रानंतर चौकशी सुरू, बीड पोलीस अधीक्षकांचे बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला पत्र
विलास घुले खून प्रकरणात सौरव सोनवणे यांना अडकवण्याचा कट वाल्मीक कराड, सुग्रीव कराड आणि रमेश घुलेनं रचल्याचा आरोप खासदार सोनवणे यांनी केला होता. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांची एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग ऐकवली होती. यानंतर बीड पोलीस अधीक्षकांना पत्रातुन वाल्मीक कराड, सुग्रीव कराड, रमेश घुले आणि बीड जिल्हा करागृह अधीक्षकांसह संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता बीड पोलिसांकडून या पत्राच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. तर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला देखील म्हणणं सादर करण्याचे पत्रातून आदेश देण्यात आले आहेत.
-
धुळे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांना वेग
धुळे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. शिंदखेडा, शिरपूरमध्ये अधिकाऱ्यांकडून बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. शिंदखेड्यात ५० टक्के, तर शिरपूरमध्ये ५५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत.
-
नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- शिवराज मोरे
नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यात ड्रग्ज कसे येतात, याबाबत तक्रार केली आहे. मुलीला मुलगा त्रास देत होता म्हणून मला फोन आला. मुलगी माझ्या मित्राची बहीण म्हणून मदतीला गेलो, असं स्पष्टीकरण शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्या आरोपांवर दिलं.
-
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं समजेल – शिवराज मोरे
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं समजेल… बन आंदोलन बदनाम करण्याचाय प्रयत्न करत आहेत. नशा – ड्रग्सचं सांगत माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न बन करत आहेत… असं वक्तव्य शिवराज मोरे यांनी केलं.
-
रोहित पवारांचा कार्यकर्ता शिवराज मोरे रस्त्यावर राडे करतोय – बन
व्हिडीओमध्ये शिवराज मोरे दिसत आहेत. शिवराज मोरे कशासाठी वाद घालतोय, रोहित पवारांनी सांगावं. नाईट लाईफ एन्जॉय करणारे विद्यार्थी आहेत का? बन यांचा सवाल…
-
न्यायव्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला – रोहिणी खडसे
न्यायव्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कारण आज विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जो रोष पाहात आहात, तो रोष ऐकून घेणं आणि त्यांना न्याय देणं अपेक्षित आहे…. असं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केलं आहे.
-
सुनावणी पुढे गेली आहे, त्यामुळे आंदोलन पूर्ण करु शकतो – रोहित पवार
सुनावणी पुढे गेली आहे, त्यामुळे आंदोलन पूर्ण करु शकतो. त्यामुळे या आंदोलनात भीमनवारांच्या आतुल सावेंचा राजीनामा झाला पाहिजे… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
-
पुण्याला आंदोलनाचं केद्र बनवू नका, कोर्टाच्या आदेशावर रोहित पवार काय म्हणाले?
पुण्यात मुलं शिकण्यासाठी येतात आणि शिक्षण घेतल्यानंतर त्यांना काम मिळणार नसेल, नोकरी मिळणार नसेल. त्यांची स्वप्न धुळीत मिळणार असतील, तर ते पुण्यात, नागपुरात शिकले काय, मुंबईत शिकले काय… जर MPSC ची यंत्रणा दुषित असेल तर त्यांना कुठेच न्याय मिळणार नाही. विद्यार्थी अभ्यास करतात आणि पेपर फुटतात. आम्ही सात दिवस आंदोलन करत असताना महाज्योतीमध्ये घोटाळा होते. हे गंभीर आहे… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
-
देवेंद्र फडणवींसांचा मित्र अध्यक्ष आहे म्हणून घोळ होतोय – रोहित पवार
कर्नाटक सरकारच्या हातातला तो विषय आहे. झारखंडच्या राज्याचा विषय आहे.. 1998 मध्ये जेव्हा पेपर फुटलेला महाराष्ट्रामध्ये तेव्हा भाजपचं सरकार होतं. त्यावेळी सगळी प्रक्रिया केली, अध्यक्षाला घरी पाठवलं. आज फरक एवढाच आहे की, देवेंद्र फडणवींसांचा मित्र अध्यक्ष आहे म्हणून घोळ होतोय.. असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
-
अध्यक्षाला घरी पाठवा, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पहिजे – रोहीत पवार
मुलांना अभ्सास करायचा आहे. पण घोटाळे सुरु असतील तर त्यांचा अभ्यास कसा होईल… अध्यक्षाला घरी पाठवा, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पहिजे… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
-
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आज कुणीही असायला नको – हायकोर्ट
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन… हायकोर्टातील सुनावणीचे अपडेट्स समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आज कुणीही असायला नको… विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येण्याची हौस असेल असं लाटत नाही – हाय कोर्ट
-
नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सेवापर्वनिमित्त परभणीत शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सेवापर्व निमित्त परभणीत शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांना आणि शाळकरी मुलींना वाटप होणाऱ्या सायकली आणि शिलाई मशीन परभणी दाखल.अडीच हजार महिलांना शिलाई मशीन आणि अडीच हजार मुलींना सायकल वाटप केलं जाणार..
-
हायकोर्टात सुनावणी सुरू
रोहित पवार यांच्या आंदोलन प्रकरणात हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.
-
ठाणे पूर्णेकर हत्या प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक
ठाणे पूर्णेकर हत्या प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक. दोषींना भर चौकात फाशी द्या. ३२ वर्षांत ठाण्यात अशी हत्या पहिल्यांदाच. पूर्णेकर हत्येचा तपास काटेकोर करा; एकनाथ शिंदेंच्या पोलिसांना सूचना, ठाण्याचं नाव बदनाम करण्यासाठी हत्येचं राजकारण सुरू प्रताप सरनाईकांचा विरोधकांवर आरोप. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल. पूर्णेकर कुटुंबीयांची एकनाथ शिंदे भेट घेण्याची शक्यता प्रताप सरनाईकांची मोठी माहिती
-
२५ कोटीहून अधिक लोकांना मोदींनी गरिबीतून बाहेर काढलं- फडणवीस
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरु केली, २५ कोटीहून अधिक लोकांना मोदींनी गरिबीतून बाहेर काढलं, असं फडणवीस यांनी मोदी यांच्या २५ वर्षाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना म्हणाले.
-
उमरगा शहरात चोरट्यांची दहशत? सीसीटीव्हीत संशयित कैद!
उमरगा शहरातील काळे प्लॉट परिसरात रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित व्यक्तींच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. रात्रीच्या अंधारात संशयित व्यक्ती परिसरात फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-
महाज्योतीच्या परिक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करणार
महाज्योतीच्या परिक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करणार, केंद्रावर संगणकच नसल्याचे परीक्षा थेट रद्द करण्यात आली आहे.
-
महाज्योतीची परिक्षा आणि केंद्रावर संगणकच नाही
महाज्योतीची परिक्षा आणि केंद्रावर संगणकच नाही, गोंधळानंतर अखेर परीक्षा रद्द, पुणे आंबेगाव बुद्रकमधील सन ब्राईट स्कूल केंद्रावर गोंधळ
-
महाज्योतीच्या पेपरमध्ये घोळ, रोहित पवारांचा आरोप
पुण्यातील आंबोगाव परीक्षा केंद्रावर घडला भलताच प्रकार,आंबेगाव परीक्षा केंद्रावरील परीक्षा आज रद्द, महाज्योतीच्या पेपरमध्ये घोळ, रोहित पवारांचा आरोप
-
विकसित भारत होईपर्यंत मी थांबणार नाही-मोदी
सर्वक्षेत्रात भारताचे नाव झाले पाहिजे, विकसित भारत होईपर्यंत मी थांबणार नाही, ही वेळ आराम करायची नाही असं मोदी म्हणाले.
-
शत्रूंना भारताची ताकद दाखवली- मोदी
कोरोना काळात भारताने स्वत: सोबत जगालाही वाचवले, आम्ही घरात घुसुन दहशतवाद्यांना मारलं, शत्रूंना भारताची ताकद दाखवली, असे मोदी भाषणात म्हणाले.
-
भविष्यातील आव्हांनासाठी आजच काम करायला हवं- मोदी
माझ्या आजवरच्या यशात देशवासियांचा मोठा हात आहे, भविष्यातील आव्हांनासाठी आजच काम करायला हवं, असे मोदी यावेळी भाषणात म्हणाले.
-
प्रत्येक क्षेत्रात भारताचा तिरंगा दिमाखात फडकतोय-मोदी
प्रत्येक क्षेत्रात भारताचा तिरंगा दिमाखात फडकतोय, विकसित भारताचं स्वप्न नक्की पूर्ण करणार, २०१४ आधी भारताचा विकास कुठेच दिसत नव्हता, असे मोदी म्हणाले.
-
भारतासारखी पुण्यभूमी कुठेच नाही- मोदी
भारतासारखी पुण्यभूमी कुठेच नाही,भविष्यात भारताच्या विमानाचीही चर्चा होईल, संपूर्ण जगात भारताच्या पायलटची चर्चा होणार, असं मोदी म्हणाले.
-
महत्वकांक्षेसाठी नाही तर मी मिशनसाठी जगणारा माणूस आहे.- मोदी
एक दिवस गौरवशाली भारताचा उदय नक्कीच होईल, २०१५ ते २०२५ भारतात कृषी क्षेघात मोठी प्रगती झाली, महत्वकांक्षेसाठी नाही तर मी मिशनसाठी जगणारा माणूस आहे असं मोदी म्हणाले.
-
देशाच्या प्राचीन गौरवाला पुनर्जिवित करायचंय- मोदी
२५ वर्षांपासून मी देशाची सातत्याने सेवा करतोय, देशाच्या प्राचीन गौरवाला पुनर्जिवित करायचंय, माझ्या आजवरच्या यशात देशवासियांचा मोठा हात आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवणार- नरेंद्र मोदी
2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवणार, मी कधीच पंतप्रधान बनेल असं मला वाटलं नव्हतं. जनता माझ्यासाठी ईश्वराचा रुप आहे, असं मोदी भाषणात म्हणाले.
-
टीकाकरांनी आत्मपरिक्षण करायला भाग पाडलं-नरेंद्र मोदी
“या देशाने मला खूप काही दिलंय, माझ्यासाठी कर्म हाच धर्म आहे, टीकाकरांनी आत्मपरिक्षण करायला भाग पाडलं” असे मोदी भाषणात म्हणाले.
-
2047 पर्यंत देशाला विकसित भारत करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाने मला खूप काही दिलं. 2047 पर्यंत देशाला विकसित भारत करणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान मोदींकडून आत्मनिर्भर भारतची घोषणा करण्यात आली आहे.
-
दादर ते नवी मुंबई विमानतळ थेट ST बससेवा आजपासून सुरू
दादर ते नवी मुंबई विमानतळ थेट एसटी बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. दादर ते अटलसेतूमार्गे धावणार बस. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दादर ते नवी मुंबई विमानतळ थेट एसटी सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
-
सेवा हा आमचा धर्म आणि कर्म आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
140 कोटी भारतीयांसाठी विनायक मंदिरात प्रार्थना केली. माझ्या आजवरच्या यशात देशवासियांचा मोलाचा वाटा. माझ्यासाठी जनताच देव आहे. जनसेवेचे 25 वर्ष आज पूर्ण झाले. सेवा हा आमचा धर्म आणि कर्म आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले
-
MPSC आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे- संजय राऊत
एमपीएससी आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहे. विरोधी पक्षाचे नेते जाऊन आले. मुख्यमंत्री पालक समजत असतील तर त्यांनी गेलं पाहिजे. भेटलं पाहिजे. राज्यपालांनी जाऊन भेटलं पाहिजे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
कधी पंतप्रधान होईल असं वाटलंच नव्हतं- नेरंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकाराचे प्रमुख म्हणून 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कधी पंतप्रधान होईल असं वाटलंच नव्हतं. लोकशाही, संविधानाला माझा नमस्कार.
-
खासदार-आमदारांचे फोटो लावत ऊस दराबाबत शेतकऱ्यांनी विचारला जाब
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे ऊसदराच्या प्रश्नावरून तेरणा पट्ट्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊस दराच्या बाबतीमध्ये उत्तर द्या! असा मजकूर लिहित खासदार आमदारांचे बॅनर ढोकीमध्ये झळकले आहेत. मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचा ऊसदरासाठी संघर्ष सुरू आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्रीय मंत्रीमंडळाकडून गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्रीय मंत्रीमंडळाकडून गौरव करण्यात आला आहे. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी घेतली सहकार आयुक्तांची भेट
राज्यातील खासगी सावकारी प्रकरणांमध्ये आयुक्त स्तरावर शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल वाढत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.जिल्हा निबंधक आणि विभागीय सहनिबंधक स्तरावर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होऊनही आयुक्त स्तरावर हे निर्णय बदलत असल्याने अशा प्रकरणांचा फेरआढावा घेण्याची मागणी त्यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.तसंच, बँकांनी कर्जवाटप करताना शासनाचे नियम पाळावेत, सिबिलसह अनावश्यक अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवू नये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
-
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची मागणी
जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची मागणी करण्यात आली. इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मुलींप्रमाणे मोफत प्रवास सुविधा द्या जळगावच्या जामनेर येथे शिवसेना शिंदे गटाच्या जामनेर तहसीलदारांना मागण्याचे निवेदन दिले. शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. भरत पवार , युवा सेना जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची निवेदनाद्वारे मागणी केली.
-
खासदार आमदारांचे फोटो बॅनर वर लावत ऊस दराबाबत शेतकऱ्यांनी विचारला जाब
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे ऊसदराच्या प्रश्नावरून तेरणा पट्ट्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊस दराच्या बाबतीमध्ये उत्तर द्या! असा मजकूर लिहित खासदार आमदारांचे बॅनर ढोकी मध्ये झळकले आहेत.मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचा ऊसदरासाठी संघर्ष सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यातील ऊसदरात ७०० ते ८०० रुपयांचा फरक का?, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ढोकी येथे जिल्ह्यातील खासदार आणि चार आमदारांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला असून, ‘या प्रश्नाचे उत्तर द्या’ असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.ऊसदरातील तफावतीवर लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
पाणी वाया घातल्यास दंड
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय,जालना शहरातील नागरिकांनी पाणी वायाला घालवल्यास आता 5 हजारापासून पासून तर 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे आणि तसे आदेशही महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी काढले.
-
रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास ६ ते ७ पोलीस गाड्या मागवण्यात आल्या आहेत. कालच रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना सवाल केलेला मुंबईला जायचं का? विद्यार्थ्यांनी जाण्याची दर्शवली आहे.
-
भाजपाच्या वतीने आज कलश यात्रेचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दी निमित्त नाशिक इथं भाजपच्या वतीने आज कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित असतील. थोड्याच वेळात कलश यात्रेला सुरुवात होणार आहे. गिरीश महाजन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
-
एक हेक्टरमध्ये केवळ एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, चिंता वाढली
यवतमाळ जिल्ह्यात यंदा वरुणराजाने अवकृपा दाखविल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. जिल्ह्यात सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू आहे. यवतमाळ तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या समक्ष शेतकरी नरेश बाजीराव गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी व मळणी करण्यात आली. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रयोगाचे उत्पादन केवळ १.०९ क्विंटल प्रति हेक्टरी आले आहे.
-
उत्तर पुणे जिल्ह्यातील भाद्रपदि बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट
शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा-राजाची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र यंदा भाद्रपदि बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपली आहेत. त्याचा थेट परिणाम बैलपोळ्याच्या बाजारावरही पाहायला मिळतोय. पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील बाजारपेठेत दुकाने सजली आहेत, मात्र ग्राहकांची वर्दळच नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
-
आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत आता ‘परफॉर्मन्स’ महत्त्वाचा
जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेसाठी गुणवत्ताधारित मूल्यांकनाचा मोठा निर्णय. मागील ३ वर्षांच्या कामगिरीचे १०० गुणांमध्ये मूल्यमापन. दरवर्षी ३१ मार्चअखेर अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा. ७१ ते १०० गुण मिळवणारे अधिकारी ‘अ-उत्कृष्ट’ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुणवत्ताधारित पदस्थापनेत प्राधान्य
-
विवेकानंद पाटीलला मी घर बांधून देणारच
त्याच्या साठी नाही निदान त्याच्या आई वडिलांसाठी. तो प्रसिद्ध झाला म्हणून हे मी करत नाही त्याच घर पाहून मी भावनिक झालो. माझे वडील पण अशाच घरात राहायचे वडील सांगायचे आठवड्यातून एक दिवस घरी अंड खायला भेटायचं. मी भावनिकतेतून म्हटल की घर बांधून देतो. एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जावं अशी आमची मागणी आहे
-
देवरुखजवळ बिबट्याची दहशत; पहाटे घरासमोर CCTVमध्ये कैद
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शहरालगत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. साडवली-सह्याद्री नगर परिसरात पहाटे घरासमोर बिबट्या फिरताना CCTVमध्ये कैद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-
नागपूर भाजपा कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न
युवक कॉंग्रेस नेते अक्षय हाते यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलीसांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरला आगेकूच केले आहे. त्यांनी काल आठ ते नऊ तास ठिय्या आंदोलन करुन अटक करवून घेतली. आणि आज पुन्हा निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि खासदारांच्या जाणाऱ्या बसेस पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बसमधून उतरुन पायी चालत जाण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून गोंधळाची स्थिती तयार झाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. आज आणि उद्याही सुनावणी झाली. पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत…त्यानिमित दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोहित पवार एमपीएससी आंदोलन एमपीएससी विद्यार्थी यांचा आंदोलनाचा सातवा दिवस… रोहित पवार एमपीएसी विद्यार्थ्यांसोबत पुण्यात आंदोलन करत आहेत. रोहित पवार विद्यार्थ्यांसोबत रात्रभर रस्त्यावर झोपले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सेवापर्व वर्षाच्या निमित्ताने शेतकरी महिलांना शिलाई मशीन तसेच विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किट वाटप केल्या जाणार आहेत.