AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पाहिजे; प्रकल्प रद्द करण्यासाठी सुप्रिया सुळेंचं भर पावसात भाषण, VIDEO

भोर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प रद्द झाला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाहिजे, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पाहिजे; प्रकल्प रद्द करण्यासाठी सुप्रिया सुळेंचं भर पावसात भाषण, VIDEO
supriya sule news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 3:25 PM
Share

पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भोर तालुक्यातील भोंगवली गावातील पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीचा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाइनचा प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. तालुक्यातील शेकडो नागरिक थेट महामार्गावर येऊन बसले. या उपस्थित आंदोलकांना खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे असं आवाहन सत्ताधाऱ्यांना केलं. तुमच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ‘बऱ्याच दिवसांनी भोर आणि राजगड तालुक्यातील सर्व पक्षीय प्रेमाचे लोक आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. मुंबईतला कार्यक्रम रद्द करून आज या आंदोलनासाठी आले आहे. घरातली लोक आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आपल्या लोकांवर अन्याय करत आहेत. संघर्ष समितीसोबत चर्चा करून मोठा वकील करून लवकरात लवकर आपले अटकेत असलेले चार जण आपण सोडवू. प्रत्येकावरचा गुन्हा मागे झालाच पाहिजे. माझा प्रयत्न आहे.. तुमच्यावतीने तातडीने मुख्यमंत्र्यांना संपर्क साधणे. प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आपल्याला शब्द दिला पाहिजे’.

काय आहे प्रकरण?

प्रस्तावित हाय व्होल्टेज सबस्टेशन प्रकल्पाविरोधात, व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करत भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलीय. भोर तालुक्यातील 71 आणि राजगड तालुक्यातील 45 अशा एकूण 116 गावांमधून या प्रकल्पाच्या 765 के. व्ही. च्या मोठ्या टॉवर लाईन जाणार आहेत. या प्रकल्पाच्या हायटेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत या बाधित गावातील शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे या गावांतील हजारो शेतकरी (Farmer),  भूमीहीन आणि अल्पभूधारक होण्याची शक्यता असून त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!