Supriya Sule : सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात बिघाड, सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजूनही सरकार…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने बिघाड दुरुस्त होऊन विमान सुखरूप दिल्लीला पोहोचले. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी प्रवासातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भर दिला आणि महाराष्ट्र सरकारने अद्यापही खास,, जगी विमानांचा वापर सुरू ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पंतप्रधानांच्या आवाहनाचाही संदर्भ दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने दिल्लीला जात असताना त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हेही सोबत होते. तात्रिक बिघाड झालेले हे विमान व्हीएसआर कंपनीचे होते, अशीही चर्चा आहे. अखेर दोन तासांनी बिघाड दुरूस्त होऊन नंतर संध्याकाळी 7 वाजता विमानाने दिल्लीच्या दिशेन उड्डाण केलं. मात्र सुनेत्रा पवार यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ माजली.
सहा महिन्यापूर्वी अशाच एका विमान खाजगी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला . आता सुनेत्रा पवार यांच्या विमानातही बिघाड झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र सुदैवाने विनाताील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर सुनेत्रा पवार व राष्ट्रावादीच्या इतर नेत्यांना घेऊन या विमानाने दिल्ली गाठलं.
याच संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रावदी काँग्रैस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. ‘ मला याबद्दल माहिती नव्हती, असं काही झालं असेल हे मला तुमच्याचकडून (पत्रकार) कळतंय. मला तर माहीत नव्हती. पार्थ, सुनेत्रा वहिनी यांची काळजी वाटली. विमानात टेक्निकल फॉल्ट आला असेल तर हा अर्थाच चिंताजनक विषय आहे’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्या कंपनीबद्दल आरोप होत राहतात
एखाद्या विमानात आपण बसतोय, आणि त्यात जर टेक्निकल फॉल्ट असेल तर ती अतिशय चिंतेची बाब आहे. गाडी असेल रेल्वे किंवा विमान, यांच्या सुरक्षिततेबद्दल मी सातत्याने बोलत आले आहे. ही जी (व्हीएसआर) कंपनी आहे, त्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहतात. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या आहेत की नाही हे मला माहीत नाही. मध्यंतरीच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांना आवाहन केलं होतं प्रवास खर्च कमी करण्याच, ताफा कमी करण्याचा. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही प्रायव्हेट विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जातंय की नाही, मला याची माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मा. पंतप्रधानांनी आम्हा सर्वांनाच सांगितलंय की, सर्वांनी सगळेच खर्च कमी करा. आणि तसंच वागण्याचा आम्ही सर्वच प्रांजळपणे प्रयत्न करत आहोत. हा विषय फक्त सुनेत्रा वहिनी प्रायव्हेट विमानाने गेल्या एवढ्यापुरता नाही, हा लार्जर कॉन्टेक्स्ट आहे. आज तेलाची काय परिस्थिती आहे, महागाई काय झाली आहे, तेल कंपन्या वगैरे, हेही लक्षात घेतलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
सरकार असंवेदनशईल, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
काहीतरी चुकीचं बोलायंच, दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं. ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसतो, हे वेदनादायी आहे. शेतकऱ्याच्या बाबाती असेल, समाजाच्या बाबतीत असेल, इतकी सत्ता या सरकारकडे आहे, पण त्यांच्यातील संवेदनशीलपणा संपलेला आहे, घरं फोडा, पक्ष फोडा, काहीही करून सत्तेत या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा या सरकारकडून होत नाही. त्यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणा दिसतो, ज्या लोकांमुळे ते सत्तेत आले, त्यांचा अपमान हे सरकार करतं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकेचा आसूड ओढला.
काँग्रेस पक्षाचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं भाषण संपत नाही
जर 12 वर्ष सत्तेत असूनही हे सरकार आजही काँग्रेसलाच नावं ठेवत असेल आणि त्यातच त्यांना आनंद मिळत असेल तर त्याच्यापेक्षा काँग्रेसचं मोठं यश काय असेल ? आम्ही जर 12 वर्ष सत्तेत असतो तर आम्ही दुसऱ्या पक्षाबद्दल कशाला बोललो असतो ? आम्ही 12 वर्ष जी कामं केली त्याबद्दल बोललो असतो ना. 12 वर्ष जर आम्ही आमच्या विरोधकांनाच नावं ठेवत बसलोय तर त्यात विरोधकांचं यश आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. काहीही झालं तरी काँग्रेस पक्षाचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
