Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार काल जाहिर करण्यात आला. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या...
Supriya Sule
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 26, 2026 | 2:04 PM

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा झाली. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य यासारख्या क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर टीका केली आहे. त्यांनी थेट हात जोडून ‘राम कृष्ण हरी’ म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत जे वक्तव्य केले होते, ते सर्वांना माहीत आहे. आमच्यासाठी हे अतिशय त्रासदायक आहे. या कटू आठवणी कायम मनात राहतील.”

वाचा: तुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरता का? ही सवय ताबडतोब बदलून टाका, नाहीतर शरीर आजारांचे घर बनून जाईल

तसेच, दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेवर बोलताना त्या म्हणाल्या, “सर्व राज्यांचे मुख्यमंत्री दावोसला जातात. मात्र, आपल्या राज्याला नेमके काय मिळाले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील वर्षी झालेले करार पुढे कसे झाले? किती गुंतवणूक आली? किती लोकांना रोजगार मिळाला? हे तपासणे गरजेचे आहे. दावोसला जाण्यात मला आक्षेप नाही, पण जगातील सध्याची परिस्थिती पाहता मला चिंता वाटते. काही देशांची अवस्था सर्वांसमोर आहे.”

पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी

पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी (सूत्र)

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)

भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)

ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)

चरण हेमब्रम (ओडिशा)

चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)

डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)

कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)

महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)

नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)

ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)

रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)

रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)

राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)

सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)

श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)

तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)

अंके गौडा (कर्नाटक)

आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)

डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)

गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)

खेम राज सुंदरियाल (हरियाणा)

मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)

मोहन नगर (मध्य प्रदेश)

नीलेश मांडलेवाला (गुजरात)

आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)

राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)

सिमांचल पात्रो (ओडिशा)

सुरेश हनगवाडी (कर्नाटक)

तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)

युनाम जात्रा सिंग (मणिपूर)

बुधरी थाठी (छत्तीसगड)

डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)

डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)

हेले वॉर (मेघालय)

इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)

के. पंजनिवेल (पुडुचेरी)

कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)

नुरुद्दीन अहमद (आसाम)

पोकिला लेकटेपी (आसाम)

आर. कृष्णन (तामिळनाडू)

एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)

तागा राम भील (राजस्थान)

विश्व बंधू (बिहार)

धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)

शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)