AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : अजून एक गोड बातमी लवकरच कळेल, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Supriya Sule : "कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही. अंमलबजावणी झालेली नाही. घोषणा फक्त केलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का, त्यात किती पुरुष आणि सरकारी अधिकारी आले कसे" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

Supriya Sule : अजून एक गोड बातमी लवकरच कळेल, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Supriya Sule
| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 1:59 PM
Share

लवकरच पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. आज पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली. बरेच दिवसांपासून जी चर्चा होती ती खरी ठरली. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. त्या शिवाय लाडकी बहिण योजना, कांदा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी यावर सुद्धा त्यांनी आपली मतं मांडली. “आमच्याकडे लग्न सध्या सुरू आहेत. पहिले युगेंद्र, जय, मग रेवती आणि आता पार्थ पवारचे आहे. पवारांच्या मुलांनी ठरवलं आहे, यंदा बँड वाजवायचा. अजून एक गोड बातमी आहे ती तुम्हाला लवकर कळेल” असं खासदार सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

“आठ लाख महिलांना केवायसी मधून काढलं. मनमोहन सिंग यांच्या काळात जनधन सुरू झाले. घरा घरात आधारकार्ड आहेत. जनधन योजनेचा डंका वाजवला मग लाडक्या बहिणींचे केवायसी का नाही करू शकले?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. “भारत सरकारचा डेटा सांगतो की अनेक लोक भारत सोडून चालले आहेत. हा माझा डेटा नाही. आंतरराष्टीय गुंतवणूक होत नाही. सोन घेऊ नका ही इकॉनॉमिकल क्रायसिस आहे ना. या सर्वांचे परीक्षण केले का ?” असं सुप्रिया सुळे यांनी विचारलं.

सरोज अहिरे एकट्या लढत आहेत

“कांद्याला भाव कसा मिळेल यासंदर्भात मी सकाळपासून बैठक घेत आहे. इगतपुरी येथील शेतकरी यांच्या भूसंपादन विषयी त्यांना न्याय कसा मिळेल याकडे लक्ष देत आहेत. सरोज अहिरे एकट्या लढत आहेत. “भारतात गरीब कष्ट करणाऱ्या लोकांना न्याय का मिळत नाही? बाकीच्यांना सूट असते. महाराष्ट्रात आणि देशात तीन मोठे क्रायसिस सुरू आहेत. महाराष्ट्रात क्राइम वाढलेले आहे. जो डेटा भारत सरकारला मिळाला, त्यात पुण्यात शिक्षणाचे हे माहेरघर आहे. ते राज्यात एक नंबर आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जयंत पाटील आउटस्टँडिंग परफॉर्मर

“कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही. अंमलबजावणी झालेली नाही. घोषणा फक्त केलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का, त्यात किती पुरुष आणि सरकारी अधिकारी आले कसे” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. “जयंत पाटील आउटस्टँडिंग परफॉर्मर आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने घेतलं आहे. आमच्या प्रत्येक सेशनमध्ये भाषण करतो. प्रत्येक खासदार बोललाच पाहिजे. नवे खासदार देखील आता बोलायला आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा