AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे क्लिन चीट वाटून मिळतील… मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा; सुषमा अंधारे यांनी डिवचले

Sushma Andhare Criticize on CM Fadnavis: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील सभेत निंबाळकर यांनी क्लीनचीट दिली होती. यावरून आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं आहे.

येथे क्लिन चीट वाटून मिळतील... मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा; सुषमा अंधारे यांनी डिवचले
Andhare and fadnavis
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Oct 29, 2025 | 5:18 PM
Share

Phaltan Female Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नावही या प्रकरणात घेतले जात होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील सभेत निंबाळकर यांनी क्लीनचीट दिली होती. यावरून आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं आहे. अंधारे नेमकं काय म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुख्यमंत्र्यांना डिवचताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री हे या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण त्यांनी न्यायाधीशाच्या खुडच्यावर बसू नये. हा त्यांचा जॉब नाही. तुमचा कार्यालयाचा बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीन चीट वाटून मिळतील. आमचा गावात 34 रणतित निंबाळकर आहेत असं त्यांनी 34 निंबाळकर तिथे आहेत तर ते 33 कोण आहेत याचा शोध घ्यावा.’

आम्हाला सीडीआर मिळाला नाही

सुषमा अंधारे यांनी सुरवातीला म्हटले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या वस्तू जप्त केल्या जातात. लॅपटॉप, फोन आणि इतर गोष्टी सील केल्या जातात आणि त्याची माहिती गोपनीय ठेवली जाते. या वस्तू न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयासमोर उघडायच्या असतात. आम्ही रणजितसिंह निंबाळकर यांच्या महाडिक यांच्यात काही संवाद झाला का? महाडिक आणि धुमाळ यांच्यात संवाद झाला आहे का? याची सीडीआरची मागणी करत आहोत, मात्र याबाबत कोणतीही माहिती पुढे येत नाहीये.

पोलीसांवर गंभीर आरोप

पोलीसांवर आरोप करताना अंधारे म्हणाल्या की, काल निंबाळकर यांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितले नाही. पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या. आता मला पोलीसांना प्रश्न विचारायचा आहे की. पोलीसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला आहे. पुढे बोलताना अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांनी कोणत्या अधिकाराच्या खाली सीडीआरबद्दल भाष्य केलं असा सवाल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष