AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांची आरोग्य विभागातील कामांना स्थगिती, तानाजी सावतांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तानाजी सावंत यांनी 3190 कोटींच्या कामांच्या स्थगितीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे सांगितले आणि कोणताही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले.

फडणवीसांची आरोग्य विभागातील कामांना स्थगिती, तानाजी सावतांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
tanaji sawant devendra fadnavis
| Updated on: Mar 03, 2025 | 5:25 PM
Share

महाराष्ट्रात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आज पार पडला. यावेळी शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी हजेरी लावली. तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तब्बल 3190 कोटींच्या कामांना राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या चर्चांवर नुकतंच तानाजी सावंत यांनी भाष्य केलं. तसेच तानाजी सावंत यांनी जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.

तानाजी सावंत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिले.

तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय घेतले

“गेल्या दोन दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरु आहे, त्या विषयाची माहिती घेणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3190 कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी 108 गाड्याच्या बाबतीत 10 हजार, 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण अभासी जगात जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचे. एखाद्याला बदनाम करायचं हे चुकीचं आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत”, असे तानाजी सावंत म्हणाले.

अडीच हजार हॉस्पिटल स्वच्छता ही 70 कोटीत शक्य आहे का?

“माझ्या कार्यकाळात अनेक चांगले कामं केली. 70 कोटींत महाराष्ट्रातील 2500 हजार हॉस्पिटल साफसफाई करणं सोप्पं होतं का? वैद्यकीय विभागाची ऑर्डर झाली होती. माझ्या खात्याने 84 रु पर स्क्वेअरफुटने ठरवलं. हायकोर्टात आपलेच काही लोकं गेली. 12 लोकांनी कॉम्पिट केलं, वर्क ऑर्डर झाली, एमओयू झालं, महाराष्ट्र शासनातील एक रुपयाचाही कॉर्टक्ट दिलं. हॉस्पिटल मध्ये येणारा रोजंदारी करणारा वर्ग आहे. मोफत उपचार सुरू केले. अडीच हजार हॉस्पिटल स्वच्छता ही 70 कोटीत शक्य आहे का?” असा सवालही तानाजी सावंत यांनी विचारला.

प्रकाश आबिटकरांनी एक सीट ठेवावी

“शासन म्हणून धोरणात्मक निर्णय घेण आमचं काम असतं. टोटल टेंडर 12 हजार कोटींचा असेल तर 12 हजार कोटी म्हणायचं. कुठेही एक रुपया खर्च झाला नाही. हायकोर्टाच्या आदेशाने निर्णय होईल सांगितलं. कुत्रा चावतो तर कुत्र्याला चावायचं का? मी कालही म्हटलं होतं संजय राऊतला मेंटल हॉस्पीटल मध्ये एक जागा रिक्त ठेवली. मी आजही सांगतो, प्रकाश आबिटकरांनी एक सीट ठेवावी”, असे तानाजी सावंत म्हणाले.

“कायदेभंग असेल तर कायदेशीर कारवाई चालू करावी. वडील म्हणून, मला जो निर्णय घ्यायचा होता, सगळ्यांकडून विनंती केली आहे. जितेंद्र आव्हाड जर माझ्या जागेवर असते तर त्यांनीही तेच केलं असतं. मी पॅनिक झालो होतो, माझा परिवार पॅनीक झाला होता”, असे तानाजी सावंतांनी सांगितले.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?