
दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करतो, भविष्य सांगतो असा दावा करणारा, स्वत:च स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि लोकाच्या विश्वासाचा, त्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन महिलांशी नको ती, अश्लील कृत्य करणारा, वर्षोनुवर्ष त्यांचं शोषण करणारा अशोक खरात (Ashok Kharat) आता तुरूंगाच्या गजांआड बसलाय. तंत्र-मंत्र करत लोकांना फसवणारा खरात आता असा अडकलाय, त्याची एकेक अशी काळी कृत्य बाहेर पडत आहेत की त्याचा पाय आणखीनच खोलात चालला आहे. पोलिसांच्या कचाट्यातून त्याची सुटका होण्याची शक्यताही धूसर आहे. गेल्या आठवड्यात त्याला अटक केल्यावर एकेक प्रकरणं, त्याच्या किळसवाण्या कृत्यांचे तपशील समोर येत चालले आहेत.
मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे आज जोचिखल झालाय, त्या सगळ्यात फसलेला खरात हा स्वत:च्याच चुकीमुळे, माजोरडेपणामुळे अडकला आहे. त्याचे काळे कारनामे आधीच बाहेर आले असते, पण नाशिकमध्ये असलेल्या त्याच्या ओळखी, पोलीस दलातील व्यक्तीशी असलेली त्याची घसट, त्याच्या भक्तामुळेच खरातचं पाप आजपर्यंत सर्वांपासून लपलं होतं. त्याच्या भक्तामुळे ही दुष्कृत्य बाहेर येण्यास वेळ लागला, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
बायकोचं ऐकायला दिला नकार, गुर्मीत मित्रांचा इशाराही धुडकावला
खरातला अटक झाल्यावर त्याच्या अटकेची इनसाइड स्टोरी तर समोर आलीच, पण त्याच्या कारनाम्यांबद्दलही अनेक अपडेट्स समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खरातने ज्या महिलांचे लैंगिक शोषण केलं होतं, ज्याचं अगदी रेकॉर्डिंगही केलेलं होतं, त्याचेच सगळे व्हिडीओ हे खुद्द अशोक खरात याच्या मोबाईलवरच काही महिन्यांपूर्वी आले होते. ते व्हिडीओ पाहिल्यानंतर खरातचे काही मिकटवर्तीय, त्याचे काही मित्र यांनी त्याला मित्रत्वाच्या नात्याने सल्ला देत सावध करण्याचा प्रयत्न केला. हाँ विष्य जास्त वाठवू नकोस, देवाण-घेवाण करून प्रकरण इथेच मिटवून टाक, असं त्याच्या काही मित्रांना त्याला समजावल.
विशेष म्हणजे खरातच्या पत्नीलाही या गोष्टीची कुणकुण लागली, व्हिडीओबद्दल कळल्यानंतर त्याच्या बायकोनेही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपली पोझिशन, मोठ्या लोकांत असलेली उठबस, पैसा यामुळे अशोक खरात याने गुर्मीतच सगळ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. समजवणारे मित्र आणि इशारा देणारी पत्नी यांना कोणालाही न जुमानता, त्यांने त्यांनाच धुडकावून लावत भलंबुरं सुनावलं. ” मला कोणाचीही भीती नाही, मोठे लोक माझ्या पाठीशी आहेत,” असं म्हणत त्याने कोणाचही ऐकण्यास नकार दिला. मात्र त्याचा माज हाच त्याच्या पतनास कारणीभूत ठरला.
पोलीस खात्यातच खरातचा सेवक
नाशिक विभागातील प्रमुख अधिकारी असलेला हा इसम भोंदू खरातचा भक्त होता. अशोक खरातच्या मुलीचं ग्न झालं, तेव्हा त्याने प्रचंड काम केलं. नंतर याच अधिकाऱ्याने खरातला व्हिडीओ आल्यावर, त्याचा मोबाईल विश्वासून पोलिसांना दिला. टेक्नॉलॉजीच्या मदतीने जेव्हा ते व्हिडीओ उघडण्यात आले, तेव्हा त्यातं जे दिसंल, त्या दृश्यांनी सर्वांचेच डोळे विस्फारले. अशोक खरातचं हे किळसवाणं कृत्य, त्याचं रूप पाहून सगळेच हादरले.
मात्र बड्या अधिकाऱ्यानेही ते व्हिडीो पाहिल्यावर त्याने खरातला अटक न करता त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण मिटवण्याचा सल्ला त्याने दिला. “हे बाहेर आलं तर मोठी बदनामी होईल, त्यापेक्षा तक्रारदारावरच खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असंही त्या अधिकाऱ्यानेच खरातला समजावलं.
अन् त्यानंतरच, एक व्यक्ती आपल्याकडे खंडणी मागत आहे, अशी तक्रार खुद्द खरातनेच पोलिसांत केली. मात्र त्या तक्रारीनंतरचं सगळी केस फिरली, तो मोठा टर्निंग पॉईंट होता. अखेर काही महिन्यांनी खरात विरोधात कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. न्यायालयाने 24 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.