AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमध्ये आयटम साँगची सुरुवात कधी झाली? एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बदलले संपूर्ण चित्र

आजकाल बॉलिवूडमध्ये असे फार कमी सिनेमा असतात ज्यांच्यामध्ये आयमट साँग नसतात. चित्रपटाच्या कथेसोबतच हे आयटम साँग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

बॉलिवूडमध्ये आयटम साँगची सुरुवात कधी झाली? एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बदलले संपूर्ण चित्र
Cuckoo MoreImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 1:59 PM
Share

ऊ अंटावा, सामी, मुन्नी बदनाम, शीला की जवानी, लैला मैं लैला, दाबिड़ी दबीड़ी, शरारत… ही काही अशी गाणी आहेत ज्यांचा चित्रपटातील कथेशी काहीही संबंध नव्हता, पण ते चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर जोडले गेले आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर सर्वांच्या ओठावर आले. आज चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा मसाला बनलेल्या या स्पेशल गाण्यांची सुरुवात कुठून झाली? चित्रपटांमधील आयटम साँगचा हा ट्रेंड आणणारे लोक कोण होते आणि हे स्पेशल आटम नंबर्स म्हणून का ओळखले गेले? शेवटी हा शब्द कुठून आला? चला जाणून घेऊया…

बॉलिवूडची पहिली सोलो परफॉर्मर कोण होती?

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात आधी अजूरीचे नाव येते. त्यांचे नाव एना मॅरी गेजेलर होते. १९३० च्या दशकात त्यांनी हिंदी सिनेमात स्टँडअलोन डान्स नंबर म्हणजेच सोलो डान्स परफॉर्मन्सची सुरुवात केली. एना मॅरी गेजेलर यांना मॅडम अजूरी या नावानेही ओळखले जाते. त्यांनी अनेक भारतीय, पाकिस्तानी आणि बंगाली चित्रपटांत काम केले. त्यांच्या व्हिडीओंचे तर कोणतेही रेकॉर्ड सापडत नाहीत, पण सोलो डान्सची सुरुवात करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव नक्कीच येते.

अजूरीनंतर आल्या कुकू मोरे आणि हेलेन

अजूरीनंतर १९४० आणि ५० च्या दशकात कुकू मोरे बॉलिवूडची पहिली मोठी कॅबरे डान्सर बनली. त्यांना हिंदी सिनेमात डान्स नंबर संस्कृतीची सुरुवात करणारी कलाकार मानले जाते. डान्समध्ये त्या इतक्या लवचिक होत्या की त्यांना रबर गर्ल म्हटले जायचे. कुकूच होत्या ज्यांनी हेलेनसाठी बॉलिवूडचा रस्ता मोकळा करण्यात मदत केली. त्या हेलेनच्या मार्गदर्शकही होत्या. कुकू मोरे यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये बरसात चित्रपटातील ‘पतली कमर है’ आणि चलती का नाम गाड़ीचे ‘हम तुम्हारे हैं जरा’ यांचा समावेश आहे. तर पुढे जाऊन हेलेनने ‘मेरा नाम चिन चिन चू’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘महबूबा महबूबा’ सारखी लोकप्रिय गाणी सादर केली.

आइटम नंबर हा शब्द कधी आला?

चित्रपटांत स्पेशल नंबर्सची सुरुवात झाली होती, पण ‘आइटम नंबर’ असा शब्द आला नव्हता. या शब्दाचा वापर १९९९ मध्ये आलेल्या शूल या चित्रपटातील एका गाण्यासाठी झाला. हे गाणे होते ‘मैं आई हूं यूपी बिहार लूटने’. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही पहिली वेळ होती जेव्हा कोणत्याही गाण्याला थेट ‘आइटम नंबर’ म्हटले गेले होते.

Follow Us
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय