AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : ‘मी तो शब्द तुमच्यासाठी वापरला नाही’ , राहुल गांधी vs किरेन रिजिजू , संसदेत फुल गरमागरमी

Rahul Gandhi : 'तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. सभागृहाची मर्यादा ठेऊन विधेयकावर चर्चा करावी' असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना म्हणाले. "राहुल गांधींनी संसदेत अशी भाषा वापरु नये" अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली.

Rahul Gandhi : 'मी तो शब्द तुमच्यासाठी वापरला नाही' , राहुल गांधी vs किरेन रिजिजू , संसदेत फुल गरमागरमी
Rahul Gandhi-kiren rijiju
| Updated on: Jul 29, 2026 | 2:07 PM
Share

परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एका विद्यार्थीनीचा दाखल देत तीन शब्द वापरले. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त. त्यावरुन संसदेत मोठा गदारोळ झाला. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. सभागृहाची मर्यादा ठेऊन विधेयकावर चर्चा करावी’ असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना म्हणाले. “राहुल गांधींनी संसदेत अशी भाषा वापरु नये. राहुल गांधी यांनी वापरलेले शब्द कामकाजातून हटवावेत” अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली. ‘राहुल गांधी असंसदीय भाषा वापरली नसती, तर आम्ही विरोध केला नसता’ असं रिजिजू म्हणाले. “राहुल गांधी हे शब्द वापरताना विद्यार्थ्याच नाव घेत नाहीयत. त्यामुळे तो शब्द राहुल गांधींच बोलतायत” असं किरेन रिजिजू म्हणाले.

राहुल गांधी असंसदीय शब्द वारंवार विद्यार्थ्याचा हवाला देऊन वापरत आहेत. एकदा नाही वारंवार तुम्ही हा चुकीचा शब्द वापरला” असं रिजिजू म्हणाले. त्यावर ‘मी तो शब्द तुमच्यासाठी वापरला नाही’ असं राहुल गांधी स्पष्टीकरण देत होते. अखिलेश यादव म्हणाले की, “विरोधी पक्षनेता सरकारवर कुठला आरोप करत असेल, तर हे सांगणं सरकारची जबाबदारी आहे की, कोणाच्या आदेशावरुन पोलीस विद्यार्थ्यांसोबत असं वागले” किरेन रिजिजू म्हणाले की, ‘ही वेगळी गोष्ट आहे’. “राहुल गांधी जे काही बोललेत ते गंभीर आहे. राहुल गांधी यांना माफी मागावी लागेल” अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली. लोकसभा अध्यक्ष बोलले की, “राहुल गांधी तुम्ही विधेयकावर बोला. चौकशीची मागणी करु शकता. पण अशा पद्धतीने बोलू नका”

त्यासाठी तुम्हाला माफी मागावी लागेल

राहुल गांधी बोलले की, जेव्हा दहशतवाद्याला गोळी मारली जाते, त्यावर रिजिजू यांनी त्यांना तिथेच थांबवलं. रिजिजू म्हणाले की, “तृम्ही गृहमंत्र्यांचं नाव घेऊन जे शब्द वापरले, त्यासाठी तुम्हाला माफी मागावी लागेल. उद्या कुठलाही सदस्य उठून काहीही बोलेल. तुम्हाला हे कसं समजलं, कुठल्या आधारावर तुम्ही बोलत आहात. असं नाही बोलू शकतं”

असे शब्द कामकाजात नसावेत

“एकतर माफी मागा, नाही तर सांगा का बोललात आणि कुठल्या आधारावर?. सभागृहाचं कामकाज असं चालू शकत नाही. स्पीकर बोललेत की, तुम्ही जे बोललात, असे शब्द कामकाजात नसावेत” असं रिजिजू म्हणाले. राहुल गांधी बोलले की, बळाचा वापर गृह मंत्र्यांच्या आदेशाने होतो. अन्य कोणाच्या आदेशाने होत नाही. त्यावर स्पीकर बोलले की, “मी सांगितल्यानंतरही तुम्ही वारंवार अवहेलना करत आहात. हे योग्य नाही”

Follow Us
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय