लोकसभा निवडणुकीचं अचूक भविष्य सांगा आणि 21 लाख जिंका

मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा असं आव्हान महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ज्योतिषांना केलं आहे. जर भविष्यवाणी खरी ठरली तर 21 लाखांचे बक्षीसही अंनिसने ज्योतिषांसाठी जाहीर केलं आहे. याआधीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अंनिसतर्फे ज्योतिषांना आव्हान करण्यत आलं होते. मात्र एकाही ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारलं नाही. महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली …

लोकसभा निवडणुकीचं अचूक भविष्य सांगा आणि 21 लाख जिंका

मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा असं आव्हान महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ज्योतिषांना केलं आहे. जर भविष्यवाणी खरी ठरली तर 21 लाखांचे बक्षीसही अंनिसने ज्योतिषांसाठी जाहीर केलं आहे. याआधीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अंनिसतर्फे ज्योतिषांना आव्हान करण्यत आलं होते. मात्र एकाही ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारलं नाही.

महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिलं गेले. काही वेळा आव्हान स्वीकारायचा दावा करून वाद-संवाद झाला. मात्र प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही. त्याचप्रमाणे मागील लोकसभा निवडणुकांच्या आधी 28 फेब्रुवारी 2014 या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसतर्फे देशभरातील ज्योतिषांना लोकसभा निवडणूक 2014 च्या निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवावे आणि ते निवडणुकांच्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी 21 लाख रूपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी महाराष्ट्र अंनिसने दिलेली होती.

काही तथाकथीत ज्योतिषांनी तर फारच उतावळेपणा केलेला होता. प्रवेशिका न पाहताच सांगून टाकलं की, मोदींचं सरकार येणार, काँग्रेसचं येणार. मला बक्षिस मिळालं तर निम्मं अनाथ आश्रमाला आणि निम्म स्वयंसेवी संस्थांना द्या. एकजण तर म्हटले की, मी तीनच प्रश्नांची उत्तर देतो, तर दुसरे म्हणाले की उमेदवाराला मला फक्त फोन करायला सांगा त्याच्या आवाजावरून त्याचं भविष्य सांगतो.

फलज्योतिष हे शास्त्र नाही, ते थोतांड आहे. ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा अशी मागणी महाराष्ट्र अंनिस यानिमित्ताने पुन्हा एकदा करत आहे. ज्योतिषाने वर्तविलेले भविष्य खरे ठरलं नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील. ज्योतिषांच्या मोहामध्ये सर्वसामान्यांनी अडकू नये. आपले भविष्य आपण घडवू, ग्रह ताऱ्यांचा अथवा हस्तरेषांचा प्रभाव जोरावर व्यक्ती आणि समाजाचे भवितव्य घडत वा बिघडत नसते हे लोकांनी समजून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *