AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाराशिवमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

धाराशिवमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
| Updated on: Feb 17, 2025 | 9:46 PM
Share

धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी जवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी परिसरात हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो लातूरहून उमरग्याकडे येत होता. तर मोटरसायकलस्वार लातूरकडे जात होता. याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये एक दुचाकीस्वार तर दोन टेम्पोमधील व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तिघांचा मृत्यू   

या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वार आणि टेम्पोमधील दोघांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर कांबळे, रा. येळी तालुका उमरगा, दीपक गणू रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा आणि आकाश सूर्यकांत रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा  अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे, मात्र अद्याप अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये.

वाहनांचं नुकसान

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढतच आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...