काळजाचा धसका उडवणारा पुण्यातील तो व्हिडीओ, अवघ्या काही क्षणात थेट…

Pune Accident : पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली.

काळजाचा धसका उडवणारा पुण्यातील तो व्हिडीओ, अवघ्या काही क्षणात थेट...
Pune accident
| Updated on: Nov 02, 2025 | 11:37 AM

पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघाताची घटना घडलीये. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पुढे आला. या व्हिडीओवरून स्पष्ट होते की, हा अपघात किती जास्त भीषण आहे. मेट्रो स्टेशनजवळ अपघात झाला असून भरधाव वेगात येणारी गाडी जोरदार खांबाला धडकली. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी रस्त्याला अजिबातच गर्दी नव्हती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळतंय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तिघांनाही रूग्णालयात दाखल केले. मात्र, दोनजण अपघातानंतर लगेचच गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक भंडारे आणि यश भंडारे अशी मृत व्यक्तीचे नावे आहेत. जखमीवर उपचार रुग्णालयात सुरू आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना गाडीमध्ये दारूच्या काही बॉटल्स मिळाल्या असल्याने ड्रंक अँड ड्राईव्हची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जखमीवर उपचार सुरू असून पोलिस त्याची चाैकशी करू शकतात.

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील या अपघाताचा धक्कादायक असा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. धडकी भरवणारा हा व्हिडीओ असून काही सेकंदामध्ये अपघात झाल्याचे दिसतंय. गाडी भरधाव वेगात खांबाला धडकली आणि मोठा आवाज झाला. मात्र, पहाटेची वेळ असल्याने लोक फार काही रस्त्यावर नव्हती, पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघाताची मालिका सतत सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कॅडबरी उड्डाणपुलावर मध्यरात्री कंटेनरचा अपघात झाला. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकला धडकून अपघात झाला. नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुल वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. पर्यायी मार्ग म्हणून उड्डाण पुलाच्या खालून प्रवास सुरू आहे. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाला दुखापत झाल्याने उपचाराकरिता जवळचा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ठाणे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून दोन क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला काढण्यात आले आहे.