AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ठाणे म्हणजे गोविंदांची पंढरी! टेंभी नाका दहीहंडीला उपमुख्यमंत्री शिंदेंची हजेरी, गोविंदांना खास सल्ला

Tembhi naka dahi handi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील दहीहंडीला हजेरी लावली होती. त्यांनी यावेळी गोविंदांसाठी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयांचाही उल्लेख केला.

Eknath Shinde : ठाणे म्हणजे गोविंदांची पंढरी! टेंभी नाका दहीहंडीला उपमुख्यमंत्री शिंदेंची हजेरी, गोविंदांना खास सल्ला
tembhi naka Eknath shinde dahi handiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 3:33 PM
Share

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु आहे. यावेळी सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचवेळी विविध ठिकाणी मानाच्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळतोय. दरम्यान, ठाण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठाणच्या दहीहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे. त्यांनी यावेळी गोविंदांशी संवाद साधलाय. मंचावरुन बोलताना शिंदे नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊयात.

कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, “टेंभी नाक्याची दिघे साहेबांच्या हंडीला सलामी देऊन पुढे दहीहंडी फोडायला जातात. त्या सर्व पथकांचं मी स्वागत करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दहीहंडी सण म्हणजे एकजुट आणि ताकद दाखवणारा आपला सण आहे. याठिकाणी 10 थर लावून रेकॉर्ड झाला आहे. ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आपण बरेच काम केले आहे. या खेळाला आपण साहसी खेळाचा दर्जा दिला. गोविंदांचे विमे काढले. त्याशिवाय प्रो गोविंदा यासारख्या खेळांतून आपली संस्कृती जपायचं काम आपण केलं आहे,” असं शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी आपण सर्वांनी सुरक्षितपणे यावेळी दहीहंडीचा आनंद घ्या. मीही अनेक हंड्या फोडल्या आहेत. ही काही जीवघेणी हंडी नाही आहे, अंसही यावेळी शिंदे यांनी सांगितलं आहे. दिघे साहेबांची हंडी ही मानाची हंडी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे, चांगला गोविंदा खेळा, सर्वांनी आपल्या सहकाऱ्यांची गोविदांची काळजी घ्या. असा काळजीवजा सल्ल्ही यावेळी शिंदेंनी सर्व गोविंदा पथकांना दिला आहे.

दरम्यान ठाण्यातील टेभी नाका येथील दहीहंडीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोविंदा हजेरी लावतात. यावेळी प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय शिंदे गटाचे अनेक कार्यकर्तेही यावेळी मंचावर उपस्थित आहेत.

याशिवाय राज्यात इतरही ठिकाणी वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे यंदाही गोविंदाला चांगलाच रंग चढला आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू