ठाण्यात कोरोना वाढतोय, जिल्हा शासकीय रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

| Updated on: Jun 15, 2022 | 2:11 PM

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रूग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण हे तिन्ही कर्मचारी रुग्णालयातील अनेकांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाण्यातील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. सध्या ठाण्यातील सक्रिय रूग्णसंख्याही दोन हजारांवर गेलीये.

ठाण्यात कोरोना वाढतोय, जिल्हा शासकीय रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!
Image Credit source: unicef.org
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ पाहिला मिळते आहे.  मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आलीये. सोमवारपेक्षा 600 रूग्ण राज्यामध्ये वाढले आहेत. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. यामुळे संसर्ग अधिक वाढण्यासाठी शक्यता वर्तवली जातेयं.  मुंबईतील कोरोना संसर्गाची संख्या 10,83,589 वर गेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,575 वर पोहोचली आहे. राज्यातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एका मुंबई शहरामध्ये आहे. विशेष: ठाण्यामध्ये कोरोनाने पाय पसरवले आहेत.

तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रूग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण हे तिन्ही कर्मचारी रुग्णालयातील अनेकांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाण्यातील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. सध्या ठाण्यातील सक्रिय रूग्णसंख्याही दोन हजारांवर गेलीये. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्येही ठाण्यातील जिल्हा शासकीयच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. ठाणे जिल्ह्यातील संसर्गाचा आकडा 7,15,305 वर पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

24 तासात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

गेल्या 24 तासात ठाण्यामध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,896 वर पोहोचली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांध्ये 8,822 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,32,45,517 झाली आहे. तर संपूर्ण भारतातील मृतांचा आकडा 5,24,792 झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाने 15 लोकांचा मृत्यू झालायं.