
उल्हासनगर : पहाटेच्या सुमारास एका इसमावर वार करून त्याचा मोबाईल (Mobile) खेचून नेल्याची घटना उल्हासनगरात शनिवारी घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या सदर इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 पथकं रवाना केली आहेत. मुन्नीलाल जयस्वाल असे मयत इसमाचे नाव असून ते उल्हासनगर कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनीत राहत होते. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. (A man attacked for mobile theft in Ulhasnagar dies while undergoing treatment)
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनीत राहणारे मुन्नीलाल जयस्वाल हे शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास परिसरातील सार्वजनिक शौचालयात शौचाला जात होते. यावेळी त्यांच्यामागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा मोबाईल खेचून नेला. ही सगळी घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेनंतर जखमी मुन्नीलाल यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात,तेथून क्रिटीकेअर या खाजगी रुग्णालयात आणि तिथून मुंबईच्या जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी 3 पथकं रवाना केली आहेत. (A man attacked for mobile theft in Ulhasnagar dies while undergoing treatment)
इतर बातम्या
Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ
Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली