वर्गात घुसला साप, सापाला पाहून शिक्षक विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

दरम्यान शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून वन अधिकाऱ्याच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे.

वर्गात घुसला साप, सापाला पाहून शिक्षक विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ
SNAKE KALYAN SCHOOL Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 2:54 PM

कल्याण : कल्याण (kalyan) पश्चिमेतील शशांक विद्यालयात वर्गात तास सुरु असतानाच साप (snake) निघाल्याने विद्यार्थी व शिक्षकाची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी सर्प मित्रांनी या सापाला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. वर्गात अचानक साप आल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते, याची कल्पना केली तरी आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. परंतु साप घुसल्यानंतर परिस्थिती पुर्णपणे बिघडली असल्याचं शिक्षकांनी (kalyan school) सांगितलं. ज्यावेळी तिथं वर्गात सर्प मित्र आला, त्यावेळी सापाला त्याने ताब्यात घेतलं

कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात शाळा भरल्यानंतर वर्गात तास सुरु होता. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या बेंच खाली साप शिक्षक व विद्यार्थ्यांना दिसला. मग काय विद्यार्थी व शिक्षकांची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. पुस्तके आणि स्कूल बॅग सोडूनच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ही शाळेच्या बाहेर धूम ठोकली. शाळेत साप असल्याची माहिती सर्पमित्राला देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता बॉम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या बेंच खाली लपलेल्या सापाला ताब्यात घेतले . साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

दरम्यान शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून वन अधिकाऱ्याच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे. शाळेत साप घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी कल्याणमध्ये पसरली. त्यानंतर अनेकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती.

हे सुद्धा वाचा

साप शाळेत आला कसा हा विषय सध्या अधिक चर्चीला जात असून सीसीटिव्ही तपासली जाणार असल्याचं शिक्षक आणि पालक म्हणत आहेत. शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना मिळाल्यानंतर पालकांनी सुध्दा शाळेत धाव घेतली. अचानक हा प्रकार घडल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली होती. सापाला पडल्यानंतर अनेकांनी सापाचं कौतुक देखील केलं.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.