Dhananjay Shinde : 27 वर्ष एकत्र नांदले आणि आता नळावरची भांडणं करतायत!, डोंबिवलीत आम आदमी पक्षाची शिवसेना भाजपवर टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेनं कोरोनाच्या काळात काम केलेल्या 250 कामगारांना कामावरून काढून टाकलं असून, याच मुद्द्यावर आता आम आदमी पक्ष कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी हे तीन चाकांचं सरकार असून एक चाक पंक्चर झालंय. दुसऱ्या चाकाचं व्हील फिट नाहीये आणि तिसऱ्या चाकात हवा कमी आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून यांना सरकार नीट चालवता येत नाहीये, अशी टीका त्यांनी केली.

Dhananjay Shinde : 27 वर्ष एकत्र नांदले आणि आता नळावरची भांडणं करतायत!, डोंबिवलीत आम आदमी पक्षाची शिवसेना भाजपवर टीका
डोंबिवलीत आम आदमी पक्षाची शिवसेना भाजपवर टीका
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 3:06 PM

डोंबिवली : शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) हे दोन पक्ष 27 वर्ष एकत्र नांदले आणि आता नळावरची भांडणं करतायत. मात्र यांच्या डोंबाऱ्याच्या खेळांमध्ये जनतेला काही इंटरेस्ट नसून महागाई कमी झाली पाहिजे, रोजगार वाढले पाहिजेत, असं म्हणत आम आदमी पक्षानं शिवसेना भाजपवर टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) हे आज डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांना शिवसेना भाजपच्या वादाबद्दल विचारलं असता त्यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली. तर महाविकास आघाडीलाही लक्ष्य केलं. कल्याण डोंबिवली महापालिकेनं कोरोनाच्या काळात काम केलेल्या 250 कामगारांना कामावरून काढून टाकलं असून, याच मुद्द्यावर आता आम आदमी पक्ष कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Aam Aadmi Party Maharashtra State Secretary Dhananjay Shinde criticizes Shiv Sena BJP)

महाविकास आघाडी तीन चाकांचं सरकार

महाविकास आघाडी हे तीन चाकांचं सरकार असून एक चाक पंक्चर झालंय. दुसऱ्या चाकाचं व्हील फिट नाहीये आणि तिसऱ्या चाकात हवा कमी आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून यांना सरकार नीट चालवता येत नाहीये, अशी टीका त्यांनी केली. तर आम आदमी पक्ष 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत देतोय, दिल्लीत सरप्लस वीज आहे, मग महाराष्ट्रात लोडशेडिंग का आहे? असा सवाल धनंजय शिंदे यांनी केला. शिवसेनेनं त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात 300 युनिटपर्यंतच्या वीज बिलात 30 टक्के सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता कोळसा नसल्याचं सांगत केंद्र सरकारवर आरोप केले जात आहेत. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीकडून हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली. जे लोक प्रामाणिकपणे वीजबिल भरतात, त्यांना वीज दिलीच पाहिजे, असंही धनंजय शिंदे म्हणाले. (Aam Aadmi Party Maharashtra State Secretary Dhananjay Shinde criticizes Shiv Sena BJP)

इतर बातम्या

PM Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, पत्रिकेवर नाव नसल्याने नवा वाद

Ravi Rana : रावणाचा अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आम्हाला फसवलं म्हणत रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका