AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा शरद पवार स्वीकारणार का? अजित पवार म्हणतात….

जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा पक्षाकडून खरंच स्वीकारला जाईल का? या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा शरद पवार स्वीकारणार का? अजित पवार म्हणतात....
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 14, 2022 | 6:10 PM
Share

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात येऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांनी आव्हाडांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापाठोपाठ विरोधा पक्षनेते अजित पवार हे सुद्धा पुण्याहून जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आव्हाडांसोबत बातचित करुन नंतर एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड खरंच राजीनामा देणार का? पक्षाकडून राजीनामा स्वीकारला जाईल का? या प्रश्नांवर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

“जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांनी राजीनामा द्यावा का याबाबत शरद पवार यांचा शेवटचा निर्णय असेल. तोच निर्णय जितेंद्र आव्हाड मान्य करतील, त्यांना पटो किंवा नको, साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील”, अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी मांडली.

विशेष म्हणजे जयंत पाटील यांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांना राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केलाय. पण पक्षातील सर्व नेत्यांची त्यांनी राजनामा देऊ नये, अशी भूमिका आहे.

अजित पवार काय-काय म्हणाले?

कुठेही विनयभंग झाल्याचं दिसत नाहीय.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराज होऊन राजीनामा दिलाय.

जितेंद्र आव्हाडांवर 72 तासांत दोन गुन्हे दाखल केले.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगायला हवं होतं.

या प्रकरणी वेळ जाईल तसा सूत्रधार कोण ते समोर येईल.

खरंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात हे षडयंत्र आहे.

पोलीसही दबावाखाली वागत आहेत.

हा लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.

आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या पाठिशी आहोत.

पोलिसांनी दबावाला बळी पडू नये.

जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याबाबतचं ट्विट मागे घ्यावं.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी