अंबरनाथ शहर वैद्यकीयदृष्ट्या स्वयंपूर्ण होणार; रुग्णालयासाठी शासनाकडून चार एकर जागा

अंबरनाथ शहर वैद्यकीयदृष्ट्या स्वयंपूर्ण होणार; रुग्णालयासाठी शासनाकडून चार एकर जागा

ही जागा शासनाने नुकतीच अंबरनाथ पालिकेला मोफत हस्तांतरित केली. या जागेचं बाजारभावानुसार मूल्य हे १६ ते १८ कोटी रुपये आहे. ही मोक्याची जागा शासनाने पालिकेला मोफत दिली आहे. या जागेवर लवकरच सुसज्ज हॉस्पिटल उभारून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

निनाद करमरकर

| Edited By: महादेव कांबळे

May 25, 2022 | 9:17 PM

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात शासनानकडून रुग्णालयासाठी 4 एकर जागा मोफत दिली आहे. कानसई परिसरात (Kansai Complex) ही जागा असून या जागेवर लवकरच सुसज्ज रुग्णालय (Equipped hospital) उभा राहणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी या जागेच्या हस्तांतरणासाठी मोठा पाठपुरावा केला होता. अंबरनाथ शहरात पालिकेचं स्वतःचं असं एकही रुग्णालय नाही. त्यामुळे शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आजही मिळत नाहीत. अत्याधुनिक सेवा सुविधांचा रुग्णालय नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत होता.

आता पालिकेच्या ताब्यात असलेलं छाया रुग्णालय राज्य शासनाच्या ताब्यात गेलं असलं, तरी तिथेही प्रसुतीच्या पलीकडे फार काही होत नाही. त्यामुळं शहरात चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, ही मोठी गरज बनली होती.

अंबरनाथ पालिकेला मोफत हस्तांतर

कोरोना काळात तर पालिकेला खासगी वास्तूत रुग्णालय सुरू करावं लागल्यानं ही गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच अंबरनाथ शहरातल्या कानसई परिसरातली डीडी स्कीममधली सर्व्हे क्रमांक 4490 अ ही 4 एकर जागा रुग्णालयाच्या उभारणीसाठी अंबरनाथ पालिकेने मागितली होती. यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला होता.

लवकरच सुसज्ज हॉस्पिटल

ही जागा शासनाने नुकतीच अंबरनाथ पालिकेला मोफत हस्तांतरित केली. या जागेचं बाजारभावानुसार मूल्य हे १६ ते १८ कोटी रुपये आहे. ही मोक्याची जागा शासनाने पालिकेला मोफत दिली आहे. या जागेवर लवकरच सुसज्ज हॉस्पिटल उभारून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी

अंबरनाथ शहरात यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. तर सुविधा भूखंडावर 100 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच आता कानसई परिसरात आणखी एक रुग्णालय उभारलं जाणार असून यामुळं अंबरनाथ शहरात वैद्यकीयदृष्ट्या स्वयंपूर्ण होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें