AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Property Tax : 15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा अन् 10 टक्के सूट मिळवा !, ठाणे महापालिकेचे आवाहन

सन 2022-23 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वितरीत करण्याचे काम प्रभाग समिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक 15 जून पर्यंत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

TMC Property Tax : 15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा अन् 10 टक्के सूट मिळवा !, ठाणे महापालिकेचे आवाहन
15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा अन् 10 टक्के सूट मिळवा !Image Credit source: tv9marathi
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 29, 2022 | 12:39 AM
Share

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन 2022-23 या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर (Property Tax), अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 15 जून,2022 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत (Discount) देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन (Appeal) ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरीता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवारी आणि रविवारी कार्यान्वित राहणार आहेत.

सन 2022-23 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वितरीत करण्याचे काम प्रभाग समिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक 15 जून पर्यंत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच 16 जून ते 30 जून, 2022 पर्यंत 4 टक्के, 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत 3 टक्के तर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत जमा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही संकलन केंद्रे कार्यान्वित राहणार

ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत जमा करु शकतील. तसेच सदर सवलत योजनेकरीता करदात्यांचा प्रतिसाद पाहता करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरीता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवार 28 मे, 2022 रोजी सकाळी 10.30 ते सायं 5 तसेच रविवार 29 मे, 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (Appeal of Thane Municipal Corporation to pay property tax till June 15 and get 10% discount)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी