Badlapur : बदलापूर शहरातील दुकानदारांना प्रशासनाची नोटीस, दुकानांच्या पाट्या मराठीत न केल्यास होणार कारवाई

| Updated on: May 12, 2022 | 7:11 AM

जानेवारी महिन्यात राज्य सरकारनं राज्यातील दुकान आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. बदलापूर शहरात सुद्धा अनेक दुकानं आणि आस्थापनाच्या पाट्या अजूनही इंग्रजी किंवा इतर भाषेत आहेत.

Badlapur : बदलापूर शहरातील दुकानदारांना प्रशासनाची नोटीस, दुकानांच्या पाट्या मराठीत न केल्यास होणार कारवाई
पाट्या बदलण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बदलापूर – बदलापूर (Badlapur) शहरातील दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत (Boards in Marathi) करण्याचे आदेश आस्थापना विभागानं दुकानदारांना दिले आहेत. याबाबतची नोटीस दुकानदारांना देण्यात ली असून येत्या आठ दिवसात दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दिलेली मुदत सोमवारी संपणार असून प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच अनेकांनी आपल्या दुकानाच्या पाट्या मराठी करायचा सुरूवात केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुकानांच्या (shops) पाट्या मराठीत करताना इतर भाषेतील अक्षरे मराठी पेक्षा मोठी नसावीत अशा सूचनाही यावेळी दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.

पाट्या बदलण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत

जानेवारी महिन्यात राज्य सरकारनं राज्यातील दुकान आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. बदलापूर शहरात सुद्धा अनेक दुकानं आणि आस्थापनाच्या पाट्या अजूनही इंग्रजी किंवा इतर भाषेत आहेत. त्यामुळं दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या याबाबत प्रशासनाकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या सोमवार पर्यंत पाट्या मराठीत करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत. दुकानांच्या पाट्या मराठीत करताना इतर भाषेतील अक्षरे मराठी पेक्षा मोठी नसावीत अशा सूचनाही यावेळी दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. येत्या सोमवार पर्यंत दुकानांच्या पाट्या बदलण्याची मुदत व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याबाबत दुकानदारांनीही सामंजस्याची भूमिका घेत दुकानांच्या पाट्या बदलण्यास सुरुवात केलीय. शहरातील सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यात येतील अशी माहिती व्यापारी संघटनेचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात सु्ध्दा लवकरचं अंमलबजावणी होण्याची शक्यता

जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडून काढलेल्या आदेशाचे अद्याप कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. परंतु बदलापूरमध्ये तिथल्या स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांना नियमावलीचं पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जो दुकानदार पालन करणार नाही अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुकानांच्या पाट्या इंग्रजी किंवा इतर भाषेत असल्याचे पाहायला मिळते. त्यावर सुध्दा प्रशासन लवकरचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

badlapur