सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण (ठाणे) : जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना सर्व्हेअरने सर्व्हे सुरु केला. भाजप आमदाराने फोनवर जाब विचारला तेव्हा आमदारांनाही उलटसूलट उत्तरे दिली. अखेर संतापलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे धडे दिले. संतप्त भाजप आमदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतोय. कल्याण ग्रामीणमधील वसार गावात एका शेतकऱ्याची जागा आहे. या जागेच्या मालकी हक्कावरुन न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट आहे. जागेच्या सर्व्हेसाठी सर्व्हेअरकडून सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र या सर्व्हेला शेतकऱ्यांनी विरोध करत संबंधित विभागाला कायदेशीर नोटीस बजावली.