CCTV Video : कल्याणमध्ये बियर शॉपमध्ये चैन स्नॅचिंग, महिलेची चेन खेचून चोरट्याचा पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात सद्गुरू बियर शॉप नावाचे दुकान आहे. या बियर शॉपमध्ये सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास एक चोरटा बियर खरेदीच्या बहाण्याने आला होता. चेहरा दिसू नये म्हणून तोंडावर त्याने रुमाल बांधला होता. या चोरट्याने दोन बियर घेतल्या आणि पैसे दिले.

CCTV Video : कल्याणमध्ये बियर शॉपमध्ये चैन स्नॅचिंग, महिलेची चेन खेचून चोरट्याचा पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये बियर शॉपमध्ये चैन स्नॅचिंग, महिलेची चेन खेचून चोरट्याचा पोबारा
Image Credit source: TV
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 7:38 PM

कल्याण : बियर शॉप चालवणाऱ्या महिलेच्या गळ्यातली सोन्याची चेन (Gold Chain) ओढून चोरट्यानं पोबारा केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. चैन स्नॅचिंगची ही घटना शॉपमधील सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसाठी आव्हान आहे. चैन सिनॅचिंग, मोबाईल चोरी असे गुन्हे दररोज उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. (Chain snatching in beer shop in Kalyan, thief escapes by pulling womans chain, incident captured on CCTV)

बियर घेण्याच्या बहाण्याने चोरटा आला अन् चैन खेचून पळाला

कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात सद्गुरू बियर शॉप नावाचे दुकान आहे. या बियर शॉपमध्ये सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास एक चोरटा बियर खरेदीच्या बहाण्याने आला होता. चेहरा दिसू नये म्हणून तोंडावर त्याने रुमाल बांधला होता. या चोरट्याने दोन बियर घेतल्या आणि पैसे दिले. त्यानंतर शॉपचालक महिलेने त्याला उरलेले पैसे देण्यासाठी गल्ल्यातून पैसे काढत होती. याच दरम्यान चोरट्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि या महिलेच्या गळ्यातली चेन ओढली आणि पोबारा केला. ही घटना शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहेत. (Chain snatching in beer shop in Kalyan, thief escapes by pulling womans chain, incident captured on CCTV)