गणेशोत्सवदरम्यान ठाण्यात लसीकरण बंद राहणार, पालिका प्रशासनाचा निर्णय

| Updated on: Sep 07, 2021 | 11:15 PM

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद राहणार आहे.

गणेशोत्सवदरम्यान ठाण्यात लसीकरण बंद राहणार, पालिका प्रशासनाचा निर्णय
Thane Municipal Corporation
Follow us on

ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (Corona Vaccination will be closed in Thane during Ganeshotsav)

संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून 1.40 लाख डोस

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून लसीचे 1 लाख 40 हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. कोकणवासीय गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी साठी 40 हजार तर सिंधुदुर्गसाठी 69 हजार डोस दिले आहेत.

मुख्यमंत्री महोदयांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून एक कोकणवासी म्हणून कोकणातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात सामंत यांनी भावना व्यक्त केल्या. सदर प्राप्त डोस दोन दिवसात नागरिकांना द्यावेत, अशा सूचना सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत. या लसी प्राप्त होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रयत्न केले आहेत.

इतर बातम्या

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या