AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी व 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981' ची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी 5 नवीन अत्याधुनिक गस्तीनौका भाडेतत्त्वावर घेण्यास राज्यशासनाच्या मत्स्यविभागाने मान्यता दिली आहे.

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका
Aslam Shaikh
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी व ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981’ ची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी 5 नवीन अत्याधुनिक गस्तीनौका भाडेतत्त्वावर घेण्यास राज्यशासनाच्या मत्स्यविभागाने मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

राज्याच्या सागरी हद्दीत होणारी अवैध एलईडी/पर्ससीन साहित्य वापरुन राज्याच्या जलधी क्षेत्रात होणारी मासेमारी, परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी रोखण्यासाठी शासनाच्या दि.०1 सप्टेंबर 2015 रोजी काढलेल्या शासन निर्णयातील गस्तीनौकांसंबंधीच्या अटी, शर्ती व तांत्रिक तपशीलांमध्ये दि. 06 सप्टेंबर 2021 रोजी शुद्धीपत्रक काढून महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

गस्तीनौका कशी असणार?

भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या गस्तीनौका ‘यांत्रिकी’स्वरुपाच्या असतील. यांत्रिकी नौकेची लांबी किमान 20 मी. व रुंदी 7.० मी असेल. नौकेची इंजिन क्षमता किमान 450 हॉर्स पॉवर (डबल इंजिन) आणि वेग मर्यादा किमान 25 नॉट एवढी असेल. नौकेवर नौकानयनासाठी संभाषणासाठी अद्यावत यंत्रसामुग्री असेल, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.

अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांना पकडणं शक्य

या नव्या बदलांमुळे गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात व अन्य राज्यांतून येऊन अनधिकृत मासेमारी करणाऱ्या वेगवान व जास्त इंजिन क्षमतेच्या नौकांना पकडणं शक्य होईल, असा विश्वास मंत्री शेख यांनी व्यक्त केला.

लवकरच नवीन कायदा

पारंपारीक मच्छीमारांचे हित केंद्रस्थानी ठेऊनच मत्स्यव्यवसाय विभागातर्फे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. एल.ई.डी व अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१’मध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. लवकरच नवीन कायदा अस्तित्वात येईल.

पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं, सव्वा कोटींची कमाई

मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले.त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लेडर) ह्याची विक्रीतून त्या मच्छिमार ग्रुपला सुमारे 1कोटी 25 लाखाची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

157 घोळ मासे सापडल्यानं नशीब फळफळले

मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.

(Government steps to stop unauthorized fishing, 5 new high speed patrolling boats)

हे ही वाचा :

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा

VIDEO: मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ

मोदींचा मंत्री मराठीच्या अभिजात दर्जाबाबत सरळसरळ खोटं बोलतो : रंगनाथ पठारे

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.