गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून 1.40 लाख डोस, उदय सामंतांच्या पाठपुराव्याला यश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून लसीचे 1 लाख 40 हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून 1.40 लाख डोस, उदय सामंतांच्या पाठपुराव्याला यश
UDAY SAMANT

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून लसीचे 1 लाख 40 हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. (1.40 lakh doses of vaccine from CM for Konkan says Uday Samant)

कोकणवासीय गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी साठी 40 हजार तर सिंधुदुर्गसाठी 69 हजार डोस दिले आहेत.

मुख्यमंत्री महोदयांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून एक कोकणवासी म्हणून कोकणातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात सामंत यांनी भावना व्यक्त केल्या.

सदर प्राप्त डोस दोन दिवसात नागरिकांना द्यावेत, अशा सूचना सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत. या लसी प्राप्त होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रयत्न केले आहेत.

नवी मुंबईतल्या नेपाळी कामगारांसाठी लसीकरण कॅम्पची मागणी

कोरोनावरील एकमेव उपाय म्हणजे कोरोना विरोधी लसीकरण असल्याचं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण कोरोना लस मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अशातच भारतात असलेल्या नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा प्रश्न तयार झालाय. त्यामुळेच नवी मुंबईत नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी लेखी मागणी माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी केलीय. त्यांनी याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देत ही मागणी केली.

सुजाता पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, “नवी मुंबई महापालिकाकडुन गेल्या पावणे दोन वर्षात करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांमुळे तसेच कोव्हीड रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आलेले आहे. नागरी आरोग्य केंद्र, महापालिकेची रुग्णालये, महापालिका शाळा, ग्रंथालये, एपीएमसी, ईएसआयएस हॉस्पिटल आदी ठिकाणाहून सुरु असलेल्या लसीकरणाच्या अभियानामुळे अनेकांना लसीकरणाचे डोस मिळणे सुलभ झाले आहे. महापालिका पातळीवर तसेच खासगी स्तरावरही करण्यात येणाऱ्या कोव्हीड लसीकरणात आधारकार्ड बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या परिवाराबाबत नव्याने अडचण निर्माण झाली आहे.”

इतर बातम्या

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

(1.40 lakh doses of vaccine from CM for Konkan says Uday Samant)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI