PHOTO : कळव्यात घरगुती सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही मात्र 6 घरांचे नुकसान

| Updated on: Mar 03, 2022 | 8:29 PM

ठाण्यातील कळवा विभागातील गोलाई नगर येथे 2 सिलेंडर ब्लास्टची घटना घडली आहे. एका सिलेंडरची गळती झाल्यामुळे हा ब्लास्ट झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या ब्लास्टमुळे 6 घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.

1 / 5
ठाण्यातील कळवा पूर्वेच्या घोलाई नगर येथे दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी एका सिलेंडरची गळती होऊन आग लागली. त्यानंतर बाजूच्याच झोपड्यात सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.

2 / 5
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सहा झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

3 / 5
घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

4 / 5
सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

5 / 5
कळवा पूर्व येथे असलेल्या अनधिकृत झोपड्यांमध्ये वारंवार अशा घटना घडत असतात. या झोपड्यांवर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा झोपड्या  निर्माण झाल्या आहेत.