Guru Purnima : गुलाबाला ‘अच्छे दिन’, गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाची मागणी वाढली, भाव दुप्पट…
Rose Rate : गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात गुलाब खरेदी करण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

ठाणे : आज गुरुपौर्णिमा (Guru Purnima) आहे. त्यामुळे सगळेच जण आपल्या गुरुबद्दल ऋण व्यक्त करत आहेत. काहीजण आपल्या गुरुंना काही विशेष भेट देत आहेत. अश्यात यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात गुलाब (Rose Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुलाबाचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हणायाल हरकत नाही. आजच्या दिवशी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आपल्या गुरुंसाठी तर भाविक देवासाठी गुलाबाच्या फुलांची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे गुलाबाचे दर तीन पट वाढले आहेत. गुलाब आधी 50 रूपये डझन मिळायचा तर आता याच गुबालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुलाब सध्या 150 डझन भावाने मिळत आहे.
गुलाबाच्या दरात वाढ
यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात गुलाब खरेदी करण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुलाबाचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हणायाल हरकत नाही. आजच्या दिवशी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आपल्या गुरुंसाठी तर भाविक देवासाठी गुलाबाच्या फुलांची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे गुलाबाचे दर तीन पट वाढले आहेत. गुलाब आधी 50 रूपये डझन मिळायचा तर आता याच गुबालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुलाब सध्या 150 डझन भावाने मिळत आहे.
चायनीज गुलाब
आधीचे दर 50 रु. डझन
आताचे दर 150 रु. डझन
काश्मीर गुलाब
आधीचे दर 60 रु. डझन
आताचे दर 200-250 रु. डझन
गावठी गुलाब
आधीचे दर 50 ते 60 रु. डझन
आताचे दर 100 रु डझन
गुलाब बुके
आधी 100 रुपयाला एक
आता 200-250 रुपयाला एक
इतर फुलांचे दर- मोगरा
आधी 1200 रु किलो
आता 2000 रु. किलो
गजरा
आधी 15 रुपयांना
आता 20 रुपयांना
चाफा
आधी एक रुपयांना एक
आता दोन रुपयांना एक
आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्त गुलाबाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर मठ मंदिरांमध्ये नेण्यासाठी चाफा, मोगऱ्याच्या सुवासिक फुलांची खरेदी होते. त्यामुळे गुलाबापाठोपाठ त्यांचेही दर वाढल्याची माहिती आहे.
