Dipali Sayyad : मी आजही तुम्हाला सांगते… दिपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं

Dipali Sayyad : विरोध तर होणारचं. जे तुम्ही केलं होतं ते लोक आजही विसरले नाहीत. तुमची भूमिका स्पष्ट होत नाही. इकडून यूपी बांधवांना तुम्ही मारमारून हकलून लावलं होतं, तिथे तुम्ही जाण्याच्या गोष्टी करता.

Dipali Sayyad : मी आजही तुम्हाला सांगते... दिपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
मी आजही तुम्हाला सांगते... दिपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना पुन्हा डिवचलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:12 PM

ठाणे: मनसे अध्यक्षव राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोधा (ayodhya) दौरा स्थगित केल्यानंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad) यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट नाही. ते स्वयं घोषित हिंदू जननायक आहेत. अखरे त्यांनी दौरा रद्द केला. मी तर आजही सांगते की, घाबरत असेल तर आदित्य साहेबांचा हात पकडा. न घाबरता तुम्ही तिथे जावू शकाल. मी पुन्हा येईन, मी जाणार… भाजपचे हे जे स्लोगन तुम्ही घेवून चाललेला आहात. ते लोकांना दिसत आहे. आज जाणार, उद्या जाणार सांगत तुम्हाला दौरे रद्द करावे लागत आहेत. खरं तर तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडा. तुम्हाला परत दौरे रद्द करावे लागणार नाहीत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

विरोध तर होणारचं. जे तुम्ही केलं होतं ते लोक आजही विसरले नाहीत. तुमची भूमिका स्पष्ट होत नाही. इकडून यूपी बांधवांना तुम्ही मारमारून हकलून लावलं होतं, तिथे तुम्ही जाण्याच्या गोष्टी करता. कुठे तरी वाद तर होणारचं ना? तुम्ही क्षमा मांगा. तिथे जा. काय करायचं हे तुम्हाला स्वतः कळतं नाही, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

तेव्हा पळून का गेला?

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही कितीवेळ घेणार आहात. दोन तालुक्यापुरती तुमची ताकद आहे. वर्षानुवर्ष तुमचे काम चालू आहे. कुठे आहेत तुमचे कार्यकर्ते? तुम्ही स्वत: पळून जाता. एवढा मोठा मुद्दा होता. तुम्ही पुढाकार घेतला तर पळून का गेला? समोरासमोर जायचं होतं ना? असा सवालही त्यांनी केला.

आता कुठे गेली ईडी?

यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांवर काय बोलायचं? आता मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता त्यांच्यावर एसीबीची कारवाई झाली. त्यांच्याकडे करोडो रुपये सापडले. त्यांच्यावर ईडी कारवाई केली जाते का? कुठे गेली ईडी? तुमचा माणूस म्हणून तुम्ही ईडीची कारवाई करणार नाहीत. कारण सेनेचा माणूस नाही. सेनेचा माणूस असता तर कारवाई केली असती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.