
आज मीरा-भाईंदरमध्ये मनसेने भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसे कार्यकर्त्यांच अटक सत्र सुरु होतं. पण हळूहळू जनमताचा रेटा वाढत गेला. मनसे मोर्चावर ठाम राहिली. अखेर पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली. या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… अशी सुद्धा घोषणाबाजी जाली.
“मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडवण्यासाठी मी आलो होतो. मराठी बांधवांना आणि मीरा-भाईंदरमधील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे
पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही आल्यावर जय गुजरातच्या घोषणा दिल्या. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे”
मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय?
मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय? यावर ते म्हणाले की, “अशावेळी मी कोणाला दोष देणरा नाही. माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती” “मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, ज्या पद्धतीने डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदपणे आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्याचा निषेध करण्यासाठी आलोय” मुख्यमंत्री म्हणातयात की, मोर्चाला परवानगी देणार होतो. पण मोर्चाचा मार्ग असा होता की, वाद निर्माण होईल. त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं की, “व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल, तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे”