Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

| Updated on: Apr 28, 2021 | 8:15 AM

या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली | Thane Mumbra hospital fire

Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत
मुंब्र्यातील रुग्णालयात आग
Follow us on

ठाणे: मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे (Fire in Hosptia) चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये 14 तर अतिदक्षता विभागात (ICU) सहा रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. (Fire in Thane Mumbra hospital 4 patients died)

मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.


मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्कजवळील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर रुग्णालय आहे. पहाटे पावणे चारच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्शिमन दलाने ही आग विझवली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेमुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा आणि फायर ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या:

Bhandup Fire | भांडुप मॉलमध्ये आग, कोव्हिड रुग्णालय आगीच्या विळख्यात

Virar Hospital Fire | विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात भीषण आग, 13 जणांचा मृत्यू

(Fire in Thane Mumbra hospital 4 patients died)