Kalyan : एकीकडे कारखाना मालकाचा अत्याचार, दुसरीकडे समाजिक संस्थेचा कार्यकर्त्यांचा कहर, वाचा काय घडले अल्पवयीन मुलासोबत?

| Updated on: Dec 29, 2021 | 9:46 PM

जिन्स कारखान्याचा मालक नजाम सिद्दीकी याच्याकडून त्या मुलाने पंधरा दिवसाच्या केलेल्या कामाचे पैसै मागितले. दररोज कामाचा मोबदला पाचशे रुपये ठरल्याप्रमाणे 15 दिवसाचा साडे सात हजार पगार झाला होता. मात्र हा पगार न देता त्याने केवळ त्याच्या हातावर शंभर रुपये टेकवले.

Kalyan : एकीकडे कारखाना मालकाचा अत्याचार, दुसरीकडे समाजिक संस्थेचा कार्यकर्त्यांचा कहर, वाचा काय घडले अल्पवयीन मुलासोबत?
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाची फसवणूक
Follow us on

कल्याण : बिहारमधील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या शेजाऱ्यासोबत कामासाठी उल्हासनगरला आला होता. जीन्स बनविण्याच्या कारखान्यात 15 काम केल्यावर त्याला आईची आठवण येऊ लागली. आईला भेटण्यासाठी तो पुन्हा बिहारला जाण्यासाठी निघाला. गावी जाताना पंधरा दिवस राबवून घेऊन जीन्स कारखाना मालकाने त्याला केवळ 100 रुपये दिले. गावातून निघताना त्याला आईने पाचशे रुपये दिले होते. तेही त्याच्याकडे होते. दुसरीकडे कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाकडून एका नामांकित सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाचशे रुपये हिसकावून घेतले. कल्याण जीआारपीने चौघांविरोधात गुन्हा दाखल करीत या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये सामाजिक संस्थेचे दोन कार्यकर्ते, जिन्स कारखान्याचा मालक हे अटकेत आहे. तर या मुलाला गावाहून उल्हासनगरला आणणारा तरुण फरार आहे.

शिलाई का शिकवतो सांगून शेजारी उल्हासनगरला घेऊन आला

बिहारच्या चंपारण्य जिल्ह्याचा एका गावात राहणारा 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आईला याच गावातील राहणारा शेजारी मुकेश राऊत याने सांगितले की, तुमचा मुलाला चांगले शिलाई काम शिकविण्यासाठी मुंबईला घेऊन जातो आणि पुन्हा आणून गावी सोडतो. मुलगा लहान असल्याने आईने सुरुवातीला नकार दिला. मात्र मुलाचे भविष्य चांगले होईल असा विचार करुन या अल्पवयीन मुलाला मुकेश सोबत मुंबईला पाठविण्यास आई तयार झाली. गावातून निघताना मुलाच्या हाती पाचशे रुपये दिले होते. मुकेश या मुलाला घेऊन उल्हासनगरला आला. एका जिन्स कारखान्यात या मुलाने पंधरा दिवस काम केले. त्याच्या आईने दिलेले पाचशे रुपये पाहून त्याला आईची आठवण आली. आईला भेटण्यासाठी गावी जाण्याचा त्याने निर्णय घेतला.

कारखान्यातील मालकाने पंधरा दिवसाचा केवळ 100 रुपये मोबदला दिला

जिन्स कारखान्याचा मालक नजाम सिद्दीकी याच्याकडून त्या मुलाने पंधरा दिवसाच्या केलेल्या कामाचे पैसै मागितले. दररोज कामाचा मोबदला पाचशे रुपये ठरल्याप्रमाणे 15 दिवसाचा साडे सात हजार पगार झाला होता. मात्र हा पगार न देता त्याने केवळ त्याच्या हातावर शंभर रुपये टेकवले. हा मुलगा ट्रेन पकडण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आला. त्याला काही माहिती नव्हते. प्रवाशांना विचारत तो फलाट क्रमांक 4 वर पोहचला. तिथून त्याला गाडी पकडायची होती. त्याठिकाणी त्याला दोन लोक भेटले. त्याची विचारपूस केली. त्याला घेऊन रेल्वे स्थानकाच्या बाहेर आले. या ठिकाणी या अल्पवयीन मुलाला धमकावून तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ, असे सांगून त्याच्या जवळचे पाचशे रुपये हिसकावून दिले. त्या मुलांच्या हाती अन्नदानाची पावती दिली. त्यानंतर दोघे मुलाला घेऊन कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आले. हा मुलगा बिहारचा आहे. तो आम्हाला मिळून आला. हे दोघे नामांकित संस्थेचे सदस्य आहेत.

पोलिसांनी कारखाना मालकासह संस्थेच्या कार्यकर्त्यांना अटक केली

पोलिसांनी मुलाला सर्व हकीगत विचारली तेव्हा त्याने सर्व काही सांगितली. पोलिसांनी हकीगत समोर येताच या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संस्थेचे दोन्ही कार्यकर्ते हरीश लालबहाद्दूर सिंग आणि नरेश अशोक उंबरे यांचा समावेश आाहे. तसेच या मुलाला बिहारहून घेऊन येणारा मुकेश राऊत आणि जिन्स कारखाना मालक नजाम सिद्दीकी याला आरोपी केले आहे. यापैकी दोन जण समतोल फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि जिन्स कारखाना मालकास पोलिसांनी अटक केली आहे. एका नामांकित संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेले हे कृत्य निंदनीय आहे. (Fraud of a minor in Kalyan, arrest of two including factory owner)

इतर बातम्या

Accident | कंटेनर आणि ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, 4 मृतांपैकी तिघांवर जागीच काळाचा घाला

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार