AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर महाआरती करु’

Ganesh Utsav 2021 | राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नियमामध्ये शिथिलता द्यावी. असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे.

'गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर महाआरती करु'
चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर भगवान श्रीकृष्णांवरही लागला होता चोरीचा आरोप
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 7:56 PM
Share

ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध शिथील करावेत. अन्यथा ठाण्यातील पालिका मुख्यालयासमोर महाआरती करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात Ganesh Utsav 2021) नियमावली जारी करण्यात आली होती. त्यामध्ये गणेशमूर्तीच्या उंचीपासून अनेक गोष्टींवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. (Lift the restrictions on Ganesh Utsav 2021)

याच नियमावलीवर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.

Bakrid 2021 Guidelines Maharashtra : ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

तसेच मूर्तीची उंची , देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबतही समनव्य समितीकडून सूचना मांडण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या नियमामध्ये शिथिलता द्यावी. असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे.

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित. * कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. *सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी *विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. * नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी. * शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. *सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत * आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. *नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. * गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

संबंधित बातम्या:

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा

मोठी बातमी: यंदा सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा; वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली

(Lift the restrictions on Ganesh Utsav 2021)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.