Murbad Trauma Center : मुरबाडच्या ट्रॉमा केअर सेंटरला शासनाकडून स्टाफ मंजूर, माळशेज घाटातील अपघातग्रस्तांना मिळणार उपचार

या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 15 कर्मचारी असणार असून त्यात 1 अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, 2 बधिरीकरण शास्त्रज्ञ, 2 डॉक्टर, 1 परिसेविका, 2 अधिपरिचारिका अशी 8 नियमित पदं असणार आहेत. तर 1 अधिपरिचारिका, 3 कक्षसेवक, 1 वाहनचालक, 2 सफाई कामगार अशी 7 पदं बाह्ययंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीनं भरायची आहेत.

Murbad Trauma Center : मुरबाडच्या ट्रॉमा केअर सेंटरला शासनाकडून स्टाफ मंजूर, माळशेज घाटातील अपघातग्रस्तांना मिळणार उपचार
माळशेज घाटातील अपघातग्रस्तांना मिळणार उपचार
Image Credit source: tv9
निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 28, 2022 | 2:48 AM

मुरबाड : मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटर (Trauma Care Center) मध्ये शासनानं 15 जणांचा स्टाफ (Staff) मंजूर केला आहे. त्यामुळं आता हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन तिथं अपघातग्रस्तांवर उपचार (Treatment) करता येणार आहेत. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाडमध्ये आतापर्यंत फक्त ग्रामीण रुग्णालय होतं. मात्र या महामार्गावर होणारे अपघात, माळशेज घाटात होणारे अपघात पाहता त्यातील जखमींवर उपचार करणं या ग्रामीण रुग्णालयात शक्य होत नव्हतं. त्यासाठी याच ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलं होतं. मात्र तिथं पदनिर्मिती झाली नसल्यानं कर्मचाऱ्यांअभावी हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊ शकलं नव्हतं.

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 15 कर्मचाऱ्यांची भरती करणार

आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 जून 2022 रोजी याबाबत शासनादेश काढत या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पदनिर्मिती केली आहे. त्यानुसार या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 15 कर्मचारी असणार असून त्यात 1 अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, 2 बधिरीकरण शास्त्रज्ञ, 2 डॉक्टर, 1 परिसेविका, 2 अधिपरिचारिका अशी 8 नियमित पदं असणार आहेत. तर 1 अधिपरिचारिका, 3 कक्षसेवक, 1 वाहनचालक, 2 सफाई कामगार अशी 7 पदं बाह्ययंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीनं भरायची आहेत. या ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीसाठी आणि तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. आता ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यानं याचा रुग्णांना फायदा होईल, असं म्हणत किसन कथोरे यांनी शासनाचे आभार मानलेत.

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर सतत मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळं या महामार्गावर अपघातांची संख्या देखील मोठी आहे. मात्र माळशेज घाटासारख्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीचे उपचार मिळणं शक्य होत नसल्यानं अनेक जखमींचा कल्याण किंवा उल्हासनगरला पोहोचेपर्यंतच मृत्यू होतो. त्यामुळं या ट्रॉमा केअर सेंटरमुळे भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचा जीव वाचू शकणार आहे. (Government approves staff for Murbad Trauma Care Center)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें