AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी

कल्याण डोंबिवलीत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या अनेक तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. स्टेशन परिसरात ही पाणी साचल्याने नागरिक पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी
| Updated on: Jul 13, 2024 | 7:03 PM
Share

कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळपासूनच सतत धार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळेच कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात गुडघ्याभर पाणी साचले आहे. पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याचा निचरा होताना दिसत आहे. मात्र पाण्याचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागत मोठ्या प्रमाणात पाणी शासनाची शक्यता आहे.

पावसामुळे डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र ऑफिस जवळील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पालिका अधिकारी यांचे दुर्लक्ष, नाले सफाई न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण स्टेशन परिसरात रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कल्याण कोर्ट स्पेशल रोडवर पाणीच पाणी आहे.

कल्याण दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गा माता चौकात पाणी साचले आहे. रहदारीचा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उल्हासनगरच्या मद्रासीपाडा परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या २ तासांपासून उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. घरात पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात चार तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी परिसरातील पोस्ट ऑफीसच्या आवारात गुडघाभर पाणी साचलं आहे.

गुहागरमध्ये पावसाचा कहर

गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसला आहे. बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत. कारण मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागानं इशारा दिला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.