KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

| Updated on: Feb 01, 2022 | 5:41 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. एकूण 133 सदस्य असणार असून यामधील 67 जागा महिलांसाठी आहेत. एकूण 44 प्रभाग असून यामध्ये 3 सदस्यांचे 43 प्रभाग असून सरासरी लोकसंख्या 34 हजार 258 आहे. तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग आहे.

KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
Follow us on

कल्याण : मागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. यंदा कल्याण डोंबिवली महापालिके(Kalyan Dombivali Mahapalika)च्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचने(Ward Structure)चा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. महापालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्र कार्यालयासह पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर हा आराखडा नागरिकांना पाहता येणार असून यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. एकूण 133 सदस्य असणार असून यामधील 67 जागा महिलांसाठी आहेत. एकूण 44 प्रभाग असून यामध्ये 3 सदस्यांचे 43 प्रभाग असून सरासरी लोकसंख्या 34 हजार 258 आहे. तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग आहे. ही प्रभाग रचना www.kdmcelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (Kalyan Dombivali Municipal Corporation’s ward structure draft plan announced)

अशी आहे प्रभाग रचना

एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार ,762

अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171

अनुसूचित जमाती : 42 हजार 584

एकूण सदस्य : 133  महिला : 67

अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07

अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02

सर्वसाधारण 116, महिला 58

3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258

4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677

प्रभाग रचना तर आधीच फोडली, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले : राजू पाटील

दरम्यान, वार्ड रचना आधीच फुटली आहे. याचे उमेदवारही ठरले आहेत असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजू पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आरोप केला आहे. फायदा तोटा घेऊन आम्ही लोकांसमोर जात नाही. लोकांना वाटले मनसे पक्ष योग्य आहे तर लोक आम्हाला मतदान करणार. आम्ही त्यांच्या अपेक्षाला उतरणार, जिसकी लाठी उसकी भैस रचना फोडली जाते. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाही. त्यामुळे त्यांच्या मनासारखी प्रभाग रचना करुन घेतली आहे. याचा मनसेला काही फरक पडणार नाही. 2010 साली दोन नंबरचा पक्ष होतो. तत्व विकून दुसऱ्यासोबत गेलो नाही म्हणून सत्तेत आलो नाही. लोक आम्हाला मतदान करतील. आम्ही मुद्दे घेऊन सकारात्मक विषय घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला मतदान करतील ही आम्हाला अपेक्षा आहे, असे राजू पाटील म्हणाले. (Kalyan Dombivali Municipal Corporation’s ward structure draft plan announced)

इतर बातम्या

मोठी बातमी | औरंगाबादेत अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना आणखी एक झटका, सोयगावात भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

Raju Patil : प्रभाग रचना तर आधीच फोडली, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले; मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया