AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : प्रभाग रचना तर आधीच फोडली, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले; मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया

यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे.

Raju Patil : प्रभाग रचना तर आधीच फोडली, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले; मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया
मनसे आमदार राजू पाटील
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 5:31 PM
Share

कल्याण : जिसकी लाठी उसकी भैस 2010 साली केडीएमसीत आम्ही दोन नंबरचा पक्ष होतो. मात्र आमची तत्वे विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही. म्हणून सत्तेत बसलो नाही कोणी कितीही वार्ड रचना फोडू द्या. यावेळी लोक आम्हाला अपेक्षेने मतदान करतील असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी केडीएमसीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यावर केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केल्या जातात. त्या पूर्ण होतात का याबाबत स्वत: लोकांनी डोकं लावावं. भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हावे असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी आहे. यंदा कल्याण डोंबिवली महापालिके(Kalyan Dombivali Corporation)च्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction on KDMC’s ward structure)

लवकर पाणीटंचाईची समस्या दूर होणार

कल्याण ग्रामीणमधील काही परिसरात अनेक वर्षापासून पाणी टंचाई आहे. नागरिकांना याचा नाहक त्रस सहन करावा लागत आहे. यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेटसुद्धा घेतली होती. पाणी पुरवठा जास्त दाबाने केला जावा यासाठी पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम नक्की केव्हा पूर्ण होणार यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर. सी. पाटील यांची भेट घेतली. याबाबत राजू पाटील यांनी सांगितले की, नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. चारशे मीटरचे काम बाकी आहे. कल्याण शीळ रस्त्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी जलवाहिनी टाकणे बाकी आहे. आता माझे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. हे पण काम लवकर होईल. काम पूर्ण झाल्यावर पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

2010 ला तत्व विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही म्हणून सत्तेत आलो नाही

वार्ड रचना आधीच फुटली आहे. याचे उमेदवारही ठरले आहेत. तुम्ही यांचे कार्यक्रम बघा. ते कोणाला घेऊन कसे चालताहेत. ठीक आहे. त्यांचे काम ते करीत आहेत. आम्ही आमचे काम करू. फायदा तोटा घेऊन आम्ही लोकांसमोर जात नाही. लोकांना वाटले मनसे पक्ष योग्य आहे तर लोक आम्हाला मतदान करणार. आम्ही त्यांच्या अपेक्षाला उतरणार, जिसकी लाठी उसकी भैस रचना फोडली जाते. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाही. त्यामुळे त्यांच्या मनासारखी प्रभाग रचना करुन घेतली आहे. याचा मनसेला काही फरक पडणार नाही. 2010 साली दोन नंबरचा पक्ष होतो. तत्व विकून दुसऱ्यासोबत गेलो नाही म्हणून सत्तेत आलो नाही. लोक आम्हाला मतदान करतील. आम्ही मुद्दे घेऊन सकारात्मक विषय घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला मतदान करतील ही आम्हाला अपेक्षा आहे.

निवडणुकीच्या तोंडावर घोषणा

निवडणुका आल्या तर काही लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होतात. मोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र वर्ष होऊनही घोषणा पूर्ण होत नाही. गेल्या वर्षी आज्याच दिवशी एका वृतपत्रत लोकग्राम पादचारी पुलाचे टेंडर काढल्याची बातमी आली आहे. असे कोणतेही टेंडर काढण्यात आलेले नाही. आता लोकांनी स्वत:चे डोके लावून भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हावे असे आवाहन मनसे आमदार पाटील यांनी केले आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction on KDMC’s ward structure)

इतर बातम्या

VIDEO: कोर्टानं जामीन फेटाळला, पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली, निलेश- पोलिसात फुल्ल बाचाबाची

Nitesh Rane Bail Application : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पण अटक नाही! वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.