AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Railway : वेळापत्रक कोलमडलं, पण थोडक्यात मोठा अनर्थ टळला! कल्याण रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

Central Railway Mumbai Local News : गाड्या थांबवण्यात आल्याने सकाळी चाकरमन्यांचे हाल झाले. कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे वेळापत्रक सकाळी कोलमडलं होतं. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या वेळीच लोकल सेवेचा खोळंबा झाल्यामुळे एकच गर्दी रेल्वे स्थानकात उडाली होती.

Central Railway : वेळापत्रक कोलमडलं, पण थोडक्यात मोठा अनर्थ टळला! कल्याण रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे
रेल्वे रुळाला तडे..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 11:22 AM
Share

ठाणे : आठवड्याभरात दुसऱ्यांदा थोडक्यात मोठा रेल्वे अपघात (Railway Accident) अगदी होता होता टळलाय. कल्याण जवळ रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) एका रेल्वे ट्रॅकला फ्रॅक्चर झाल्याचं निदर्शनास आलं होतं. ही बाब लाईनमनने पाहिली. त्याने राखलेल्या प्रसंगावनधानामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळालय. सकाळी साडे सहा ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ (Kalyan Patripool) रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाला होता. ही बाब कळल्यानंतर लाईनमनने तातडीने त्याची माहिती वरिष्ठांना दिली.

थोडक्यात अनर्थ टळला

रेल्वे ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. रेल्वे प्रशासनाने या ट्रॅकवरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तत्काळ थांबवली. त्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला.

लोकल 20 मिनिटं उशिराने

या गाड्या थांबवण्यात आल्याने सकाळी चाकरमन्यांचे हाल झाले. कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे वेळापत्रक सकाळी कोलमडलं होतं. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या वेळीच लोकल सेवेचा खोळंबा झाल्यामुळे एकच गर्दी रेल्वे स्थानकात उडाली होती. नेमकं काय झालंय, हे कळायलाही काही मार्ग नसल्यानं लोकांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

पाहा Live घडामोडी :

एकीकडे लोकल स्थानकात उशिरा येत असल्यानं दुसरीकडे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच चालली असल्याचंही दिसून आलंय. घडलेल्या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याकारणाने रेल्वे प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांना नाहत त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईत भायखळा जवळ कल्याणला जायला निघालेल्या फास्ट लोकलचा अपघात मोटरमनच्या प्रसंगावनधानामुळे टळला होता. एका अज्ञात व्यक्तीने लोकल ट्रॅकवर लोखंडी ड्रम टाकून ठेवला होता. या ड्रममध्ये दगड भरण्यात आले होते. या ड्रमची आणि लोकलची धडकही झाली होती. पण लोकलच्या मोटरमनने वेग कमी करुन लगेचच ब्रेक लावल्याने थोडक्यात निभावलं होतं.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.