मीरा भाईंदरच्या अफशाची गरुडझेप, मुस्लिम खाटीक समाजातून देशातील पहिली महिला पायलट

मीरा भाईंदरची अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट ठरली आहे. Afsha Qureshi Lady pilot

मीरा भाईंदरच्या अफशाची गरुडझेप, मुस्लिम खाटीक समाजातून देशातील पहिली महिला पायलट
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 10:30 AM

मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिम भागात राहणारी अफशा कुरेशी ही मुस्लिम तरुणी गरुडझेप घेत वैमानिक पदावर रुजू झाली आहे. मुंबईत शिक्षण घेऊन अमेरिकेत पायलट लायसन्सचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला होता. परदेशात नोकरी मिळवणे शक्य असतानाही अफशाने आपल्या मातृभूमीला प्राधान्य देत भारतात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. (Mira Bhainder Afsha Qureshi becomes first Lady pilot from Muslim Flesher Community)

खाटीक समाजातून असलेली अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट ठरली आहे. तिने गाठलेलं यशाचं शिखर, सुरु असलेला शुभेच्छांचा पाऊस आणि समाजात मिळत असलेल्या प्रतिष्ठेमुळे अफशाच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

भारतातच राहून देशसेवा करण्याची इच्छा अफशाने व्यक्त केली आहे. कुटुंबीय आणि गुरुंचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगत वडिलांनी दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे हे यश मिळाल्याचे अफशा सांगत आहे.

मुस्लिम समाजात अजूनही महिलांना काही रीतीरिवाजाप्रमाणे वागणूक दिली जाते. अनेक तरुणींचे अल्प यात लग्न लावून दिले जाते तर अनेक तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. अशात अफशाने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवून इतर महिलांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

अफशाच्या या यशाने मीरा भाईंदरमधील नेते मंडळी, राजकीय पुढारी तिची भेट घेऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मीरा रोडच्या तरुणींची हवाईझेप सुरुच

मीरा रोडला राहणारी मराठमोळी तरुणी ऋतुजा रावण (Rutuja Ravan) हिने नुकताच राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. दिल्लीत आयोजित डियाडेम मिस इंडिया 2020 (Diadem Miss India 2020) मध्ये तिने द्वितीय उपविजेतेपद पटकावलं.

ऋतुजा रावण सध्या एका विमान सेवा कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करते. Diadem Miss India 2020 च्या 2nd runne rup होण्यापर्यंत ऋतुजाचा प्रवास सोप्पा नव्हता. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रातील अनुभव अगदीच नगण्य होता. नवीन क्षेत्र आणि प्रचंड स्पर्धा याची माहिती असतानाही केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर तिने यश मिळवलं.

संबंधित बातम्या : 

मीरा रोडच्या मराठमोळ्या तरुणीचा देशात डंका, ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद

डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही तगडा पगार, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुलभाला 46.27 लाखांचं पॅकेज

(Mira Bhainder Afsha Qureshi becomes first Lady pilot from Muslim Flesher Community)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.