VIDEO: ठाण्यातील नव्या कोऱ्या कोपरी पुलाला तडे; मनसेचं ठेकेदाराविरोधात जोरदार आंदोलन

नव्या कोऱ्या कोपरी पुलाला तडे गेल्याने मनसेने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा पूल धोकादायक असल्याचं सांगत मनसेने आज ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. (New Kopri Bridge crack, MNS demands action against contractors)

VIDEO: ठाण्यातील नव्या कोऱ्या कोपरी पुलाला तडे; मनसेचं ठेकेदाराविरोधात जोरदार आंदोलन
mns


ठाणे: नव्या कोऱ्या कोपरी पुलाला तडे गेल्याने मनसेने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा पूल धोकादायक असल्याचं सांगत मनसेने आज ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मनस सैनिकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. (New Kopri Bridge crack, MNS demands action against contractors)

मनसेने ठाण्यातील कोपरीमधील नवीन पुलाला तडे गेले आहेत. या पूलाला काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं सांगत मनसेने याच पुलावर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आधी मनसे नेत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात महिला आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

या पुलाला तडे गेल्याने ठाण्याहून मुंबईला जाणं कठिण झालं आहे. कारण या पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रवासी आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास कसा करतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच या पुलाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अहवालात ताशेरे

एलआयटीचा अहवाल आला आहे. तो अहवाल उघड केला जात नाही. आमच्या माहितीप्रमाणे या अहवालात पुलाच्या कामावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या कामात अनेक त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे काम झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांनी केली आहे.

आधी टाळमृदुंग आंदोलन

नवीन बांधलेल्या कोपरी ब्रिज वापरण्यापूर्वीच तडे गेल्याचे निदर्शनास आले असताना मनसेने या आधी एमएमआरडीए प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात टाळ मृदुंग, ढोलकी वाजवत आंदोलन केल होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पुलाला तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याचे मनसेने निदर्शनात आणले होते. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे. याच कोपरी पुलाचे युतीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेले होते. तर आता या पुलाला आणखी किती वेळ खुला होण्यासाठी लागणार हेच पाहणे गरजेचे आहे मात्र सद्या तरी तडे गेलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

टोलनाका फोडला

भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यानी फोडला. काल सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी करत हा टोल नाका फोडला. त्यानंतर काही वेळ घोषणा देऊन हे कार्यकर्ते निघून गेले. 1 रोजी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर श्राद्ध आंदोलन केलं होतं. रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा टोल वसुली बंद करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली होती. मात्र, त्यानंतरही काहीच पावलं उचलण्यात आली नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

भिवंडी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय या रस्त्यावर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आधी इशारा आंदोलन करून प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, खड्डे दुरुस्ती न झाल्याने त्यांना आज आंदोलन करावं लागलं. (New Kopri Bridge crack, MNS demands action against contractors)

संबंधित बातम्या:

VIDEO: खड्डे दुरुस्त न करता टोल वसुली; मनसेने भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका फोडला

दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

प्रेयसीने त्याच्यासाठी घर विकलं, पैसे दिले, पण प्रियकराने तिच्या तीनही लेकरांसह तिला संपवलं, युपीतल्या चार हत्यांचं ठाणे कनेक्शन

(New Kopri Bridge crack, MNS demands action against contractors)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI