Thane Hospital : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जलद सुविधा मिळणार, पालिका अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

| Updated on: Jun 30, 2022 | 2:43 AM

संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांची प्राथमिक तसेच आजाराबाबतची माहिती, जुने रिपोर्ट आदींची माहिती अवगत असल्यास उपचार करण्यास सोयीचे जाते. याकरीता प्रभावी पद्धत अंमलात आणून रुग्णाचा वेळ वाचण्यासाठी विभागाने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे संपूर्ण रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले.

Thane Hospital : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जलद सुविधा मिळणार, पालिका अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital)त येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा (Medical Service) मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश (Instructions) अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी दिले. निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव जाधव, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. सूचितकुमार कामखेडकर, डॉ. शैलैश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्या सर्व रुग्णांना तपासणी, चाचण्या करण्यासाठी विविध विभागांना जावे लागते. अशा वेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांची प्राथमिक तसेच आजाराबाबतची माहिती, जुने रिपोर्ट आदींची माहिती अवगत असल्यास उपचार करण्यास सोयीचे जाते. याकरीता प्रभावी पद्धत अंमलात आणून रुग्णाचा वेळ वाचण्यासाठी विभागाने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे संपूर्ण रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले.

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, निवासी डॉक्टरांच्या पदोन्नती करणे, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, नर्सिंग स्टाफ व टेक्निशियन आदींच्या पदोन्नती करण्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यास अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी संबधितांना सूचना केल्या. (Quick facility will be available at Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalava)

हे सुद्धा वाचा